वसमत बाजार समिती मार्केट यार्डात महाअन्नदान,बाजार समितीने केली शेतकरी,नागरिकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था

वसमत (प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड मोढ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या वेळी भव्य महाअन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला

वसमत बाजार समितीत मागील वर्षापासून आगळ्यावेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असून सोमवारी बाजार समितीत येणारे शेतकरी बांधव,नागरिक, हमाल मापारी सदस्यांसाठी महाअन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला 

या प्रसंगी सभापती तानाजी बेंडे,उपसभापती सचिन भोसले,सचिव सोपान शिंदे सह सर्व सन्मानीय संचालक  सह आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, 

अन्नदानाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुनीम व हमाल मापारी संघटनेने परिश्रम घेतले

थंड पाण्याची व्यस्था-
बाजार समितीत येणारया शेतकरी बांधव,नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे या साठी बाजार समिती परिसरात थंड पाण्याचे २ वॉटर फिल्टर  बसवण्यात आल्याची माहिती सभापती तानाजी बेंडे यांनी गौरव महाराष्ट्राचाशी दिली आहे

News Category: 
Basmat

Sharing