पूर्णाच्या इथेनॉल प्रकल्पाचे उद्या मान्यवरांचे हस्ते उद्घाटन,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी मंत्री कमल किशोर कदम,खासदार बंडु जाधव ची उपस्थिती

वसमत : (प्रतिनिधी)
१८ मार्च उद्या शनिवारी येथील पुर्णा सहकारी साखर कारखाना येथे नवीन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन व नवीन सीबीजी प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री कमल किशोर कदम, खासदार बंडु जाधव सह मान्यवरांच्या  उपस्थितीत संपन्न होणार आहे

राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा पूर्ण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कुशल नेतृत्वाखालील नांदेड, परभणी,हिंगोली तीन जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या पुर्णा सहकारी साखर कारखान्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या नवीन इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन व नवीन सीबीजी प्रकल्पाचा  भूमिपूजन सोहळा शनीवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.तर उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम,वसमत चे आमदार राजूभैय्या नवघरे आदी प्रमुख राजकीय मंडळीची उपस्थिती राहणार आहे. 

उद्घाटन समारंभा नंतर कारखाना साइटवर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शेतकरी बांधवांना मान्यवर मंडळींचे मनोगत,मार्गदर्शन लाभणार  आहे कार्यक्रमासाठी येणाऱ्या शेतकरी,सभासद व नागरिकांच्या स्नेह भोजणाची व्यवस्था पूर्णा प्रशासनाकडून करण्यात आली असून कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर,कार्यकारी संचालक अमोल पाटील, उपाध्यक्ष प्रल्हादराव काळे व समस्त संचालक मंडळांनी केले आहे.

News Category: 
Basmat

Sharing