जिल्ह्यात हाय डेसिबल (ध्वनी) आवाजात डी.जे  वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार,आयोजक व डीजे मालकाविरुद्ध होणार कार्यवाही,जिल्हा पोलीस अधिक्षक जि.श्रीधर यांचा इशारा

हिंगोली (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यातील मिरवणुका,धार्मिक कार्यक्रम,उत्सव,लग्न वराती आदी ठिकाणी विहित प्रमाणापेक्षा जास्त डेसिबल (ध्वनी) आवाजात (डी.जे) चा वापर केल्यास आयोजक व डिजे मालकावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी प्रसार माध्यमातून दिला आहे. 

ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० अन्वये तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाचे सुचनेनुसार ध्वनीक्षेपक वापराबाबत निश्चीत डेसीबलची (आवाज) मर्यादा ठरवुन दिलेले आहेत. तरी सर्व नागरीकांना आवाहन आहे कि, नमुद ध्वनी प्रदुषण अधिनियम २००० व मा. सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक सुचना यांचे ध्वनीक्षेपक वापरतांना तंतोतंत पालन करावे. यापुढे कोणतेही सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, राजकिय कार्यक्रम, लग्ण समारंभ व ईतर प्रसंगी मर्यादेच्या पलीकडे आवाज असणारे ध्वनीक्षेपक (डी.जे.) चा कोणीही वापर करू नये जिल्हा पोलीस दलाकडुन वेळोवेळी त्या बाबत तपासणी करण्यात येणार असुन मर्यादीत आवाजापेक्षा अधिक आवाज असणारे ध्वनीक्षेपक डी.जे.वर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यात असे डी.जे. लावुन कार्यक्रम घेणारे आयोजक तसचे डी.जे. चा मालक यांचे विरूध्द विवीध कायदा व कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असुन असे मर्यादेपेक्षा अधिक आवाज असणारे डी. जे. चे सर्व साहीत्यही जप्त केल्या जाणार आहे.

आगामी सण उत्सव काळात सदर नियमांची काटेकोर  अंमलबजावणीसाठी पोलीस विभागाचा कस लागणार असल्याचे बोलले जात आहे

Sharing