गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास वसमतला अटक,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व वसमत ग्रामीण पोलिसांची कारवाई


वसमत (प्रतिनिधी)
विनापरवाना व बेकायदेशिर हत्यार ( गावठी पिस्टल ) बाळगणा-या विरूध्द स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण यांनी कार्यवाही करत दिनांक ३१ मार्च रोजी
वसमत येथील एका युवकास अटक केली आहे
मा.पोलीस अधीक्षक हिंगोली श्री.जी.श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गोपनीय रित्या माहीती मिळाली कि,इसम नामे- राजुसिंग लखनसिंग चव्हाण रा.रेल्वे स्टेशन समोर वसमत हा त्याचेजवळ विनापरवाना बेकायदेशिर गावठी पिस्टल बाळगुन आहे अशा माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण च्या पथकाने दोन पंचासह नमुद इसमाबाबत माहीती घेत असता तो दगडगाव म्हातारगाव चौक या ठिकाणी आहे या बाबत माहीती मिळालेवरून सदर ठिकाणी जावुन वरील पोलीस पथकाने नमुद इसम नामे राजुसिंग लखनसिंग चव्हाण रा. रेल्वे स्टेशन समोर वसमत,यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ एक लोखंडी गावठी पिस्टल मॅक्झीन खाली असलेले कि.अं. २०,००० रु. मिळुन आले.
सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार यांच्या तक्रारि वरून नमुद इसमाविरूध्द पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण येथे गुरनं. ८४ / २०२३ कलम ३/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हाचा पुढील तपास पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांचे मागदर्शनाखाली स्थागुशा पो.नि.पंडीत कच्छवे, सपोनि सुनिल गोपीनवार पो.स्टे.वसमत ग्रा.प्रभारी अधिकारी सपोनि अनिल काचमांडे,पोलीस अंमलदार राजुसिंग ठाकुर,आकाश टापरे,विठठल काळे,सुमित टाले,तुषार ठाकरे,गोरे, विभुते यांनी केली.