अल्पवयीन मुलीला देहविक्री करण्यास भाग पाडले,दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध,पोक्सो,अंतर्गत गुन्हा दाखल

वसमत (प्रतिनिधी)
वसमत शहरात एका अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी दोन आरोपींवर वसमत शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील श्रीनगर येथील एका घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती वसमत शहर पोलिसांना मिळाली.असता बुधवार दि 5 एप्रिल रोजी दुपारी 3.15 वाजता वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,पोउपनि राहुल महिपाळे,पोउपनि शेटे मैडम,पोलीस हवालदार शेख नय्यर,कृष्णा चव्हाण,केशव गारोळे, पोलीस नाईक संदीप चव्हाण,पंडीत बोदेमवाड, महिला पोलीस अमलदार आम्रपाली कांबळे, बिटलेवाड,कविता तुरुकमाने आदींच्या पथकाने सदर घरावर छापा टाकला असता कारवाईत एक अल्पवयीन मुलगी एका पुरुषासोबत लज्जास्पद अवस्थेत आढळून आली.त्यानंतर मुलीने माहिती दिली की,श्रीनगर येथील रहिवासी असलेल्या आरोपी महिलेने मुलीच्या कमकुवत आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तिला देह व्यवसाय करण्यास भाग पाडले.या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांच्या फिर्यादीवरून वेश्याव्यवसाय चालवणारी आरोपी महिला आणि पिंपळा चौरे येथील रहिवासी वैभव अच्युत चौरे यांचावर गुरंन कलम १९४/२०२३ नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये कलम ३, ४, ५ सह कलम ७,८,१७ पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत 

पैशाचे अमिश दाखवून गरीब मुली /महिलांना वाम मार्गाला लावणाऱ्यांचा शहर पोलीस शोध घेत आहे आपल्या परिसरात अशा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास मोबाईल  7083552233 वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा वसमत शहर चंद्रशेखर कदम यांनी केले आहे

News Category: 
Basmat

Sharing