उत्कृष्ट कामगिरी बद्दल उंबरकर,कोळेकर,मुकाडे, घुगे,हलगे,यांना महासंचालक सन्मान चिन्ह जाहिर

महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पाच अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर झाले आहे.
प्रतिवार्षिक महाराष्ट्र पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी व सतत उल्लेखनीय कार्य व प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस अधिकारी व अंमलदार यांना पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांचेकडून पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. त्यानुसार २०२२ करीता हिंगोली पोलिस दलातील हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत सहा पो.उप नि नारायण मुकाडे, अंमलदार अशिष उंबरकर व स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत अंमलदार विठ्ठल कोळेकर, अशोक घुगे,नागरी हक्क संरक्षण विभागाचे निलेश हलगे यांनी आपल्या कार्यकाळात पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह जाहिर झाले आहे.
सदर सन्मान चिन्ह १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधीकारी,पोलिस अधीक्षक, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सदर पाच जणांना महासंचालक सन्मान चिन्ह जाहिर झाल्या बद्दल हिंगोली पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी व मित्र मंडळीच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.