"त्या" खून प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना घेतले ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा वसमत शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

वसमत (प्रतिनिधी)
२० वर्षीय ओमकार सोमनाथ हेरे या युवकाच्या खून प्रकरणी आरोपी असलेल्या चार पैकी तीन प्रमुख आरोपींना वसमत शहर पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखा  हिंगोलीच्या पथकाने ताब्यात घेल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे

१६ मे रोजी सायंकाळी ओमकार सोमनाथ हेरे वय वीस वर्ष राहणार रवींद्रनाथ टागोर कॉलनी यास किरकोळ कारणावरून दुचाकी वरून टाकळगाव शिवारात नेऊन मारहाण केल्याने नांदेड येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी हेरे कुटुंबीयांनी मृतदेह थेट शहर पोलिस ठाण्यात आणले यावेळी योग्य ती कारवाई करून ४ दिवसात आरोपींना गजाआड करू असे आश्वासन शहर पोलिसांनी हेर कुटुंबीयांना दिले होते 

दरम्यान वसमत पोलीस स्टेशनचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी संयुक्त मोहीम राबवून तपास चक्रे फिरवत अवघ्या काही तासातच खून करणारे मुख्य आरोपीपैकी यश चंद्रकांत चहाड,युवराज कदम,ओंकार मोहिते या तिन आरोपीस परजिल्ह्यातून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर केले आहे  

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विवेकानंद वाखारे,पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम,पोलीस निरीक्षक श्री पंडित कच्छवे, यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे,पोलीस स्टेशन वसमत चे पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे,पोलीस अंमलदार वाघमारे,शेख हकीम,संदीप जोंधळे,विवेक गुंडरे,राजू ठाकूर तुषार ठाकरे,बुरखे, आकाश टापरे,विठ्ठल काळे.महिला अंमलदार तुरुक माने यांच्या पथकाने केली आहे.

अन्य प्रमुख एक आरोपी व अन्य अनोळखी आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली आहे

Sharing