हिंगोली जिल्हयात एकाच वेळी विशेष कोम्बींग (ऑलआउट ) ऑपरेशन,१७ ठिकाणी मोक्का, तडीपार,फरार आरोपींची तपासणी,अवैध शस्त्र बाळगणा-या तिन जणांवर कार्यवाही

हिंगोली (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दि ४ च्या रात्री ते ५ च्या पहाटे दरम्यान  जिल्ह्यात एकाच वेळी विशेष कोम्बींग (ऑलआउट ) ऑपरेशन राबवुन १७ ठिकाणी मोक्का,तडीपार,फरार आरोपींची तपासणी करण्यात आली तसेच अवैध शस्त्र बाळगणा-या तिन जणांवर कार्यवाही करण्यात आली आहे

जिल्हा पोलीस दलाने जिल्हयातील सराईत 
गुन्हेगार व लपुन छपुन चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भूमिका घेत तसेच यापुर्वी गंभीर गुन्हयातील तसेच चोरी,जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांचे विरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली आहे
त्याचाच भाग म्हणुन गुन्हेगारांची तपासणी, अवैध्द धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा.पोलीस अधीक्षक श्री.जी.श्रीधर यांचे मार्गदर्शनात दिनांक ०४ ऑगस्ट चे रात्री ११ पासुन दिनांक ५ ऑगस्ट चे सकाळी ०५.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले 

सदर मोहीमेत मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपान शेळके,प्रशांत देशपांडे, पोलीस निरीक्षक स्थागुशा पंडीत कच्छवे,पो.नि. विकास पाटील, पो.नि. वैजनाथ मुंडे,पो. नि. रणजित भोईटे,पो.नि. गणेश राहीरे,पोनि शिवाजी गुरमे,सपोनि अनिल काचमांडे,सपोनी गजानन बोराटे,सपोनि विलास चवळी,सपोनि गजानन मोरे,सपोनि रवि हुंडेकर, सपोनि अरूण नागरे सर्वच पोलीस स्टेशन मधील दुयम पोलीस अधिकारी व मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण १७ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडुन गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हयातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकाणी नाकाबंदी करण्यात येवुन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली तर नाकाबंदी दरम्याण पोलीस स्टेशन हिंगोली शहर येथे ०१ संशयीत वाहन डिटेन करण्यात आले.

तसेच सदर मोहीमेत पोलीस स्टेशन वसमत शहर, हिंगोली शहर व कुरूंदा येथे अवैध्द शस्त्र बाळगणा-या विरूध्द ०३ हत्यार कायदा कलम ४ / २५ अन्वये अन्वये ०३ गुन्हे दाखल करण्यात आले

News Category: 
Maharashtra

Sharing