पूर्णा बॅरेजसच्या माध्यमातून वसमत मतदार संघातील  ६ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होईल ,उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत सिंचन बैठक संपन्न,वसमत मतदार संघातील सिंचन अनुशेष भरुन काढण्यासाठी आ.राजू भैया नवघरे यांचे प्रयत्न

फेरोज पठाण (संपादक)
पूर्णा बॅरेजस संदर्भात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली असुन सदर प्रकल्पास लवकरच सुरुवात होऊन वसमत मतदार संघातील ४२ गावातील ६ हजार हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होईल असा विश्वास आ.राजुभैय्या नवघरे यांनी व्यक्त केला आहे

प्रसार माध्यमातून या बाबत त्यांनी दिलेल्या माहिती नुसार हिंगोली जिल्हा हा सिंचन अनुशेषात येतो. हा अनुशेष भरून काढण्यासाठी पूर्णा बॅरेजस या महत्वपूर्ण योजनेचे काम होणे अत्यंत आवश्यक आहे.पूर्णा बॅरेजस या योजनेमुळे पूर्णा नदीवर उच्च पातळीचे बंधारे निर्माण होऊन वसमत विधानसभा मतदारसंघातील ४२ पेक्षा अधिक गावे व ६०००  हेक्टर पेक्षा जास्त सिंचन क्षेत्र हे निर्माण होईल.
या मध्ये १)पोटा ता.वसमत-९•५७ दसलक्ष घनमिटर, २) जोड परळी ता.वसमत ९•७५ दसलक्ष घनमिटर,३) पिंपळगाव कुटे ता.वसमत-८•९४ दसलक्ष घनमिटर ता.वसमत,४) ममदापुर-९•१० दसलक्ष घनमिटर ता.पुर्णा या उच्च पातळी बंधाऱ्याचा समावेश आहे. 

पदभार स्वीकारल्या पासून या पूर्णा बॅरेजसचा अतिशय चीवटपणे पाठपुरावा करत आहे.पुर्वी जुने पाणी उपलब्धता प्रमाणपत्र होते म्हणून अडचण जात होती, ती २०२२ मध्ये पाठपुरावा करून नवीन २.८ TMC पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळवून ती अडचण दूर केली. त्यानंतर ही तांत्रिक छाननी आदी बाबीचा पाठपुरावा केला व पूर्णा बॅरेजसचे काम मंजुरीसाठी मंत्रालयाच्या वित्त व नियोजना विभागाच्या शेवटच्या टप्यात आणले.एक दिड वर्षाच्या कालांतराने मुबंई येथे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व मा.मंत्री तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या उपस्थितीत यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये पूर्णा बॅरेजस संदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल अशी सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीमुळे पूर्णा बॅरेजस या महत्वाकांक्षी योजनेला गती प्राप्त झाली आहे व लवकरच पूर्णा बॅरेजसचे काम सुरू होईल असा विश्वास आ. नवघरे यांनी व्यक्त केला आहे. 

या बैठकीमध्ये गोदावरी पाटबंधाऱ्याच्या महामंडळाचे एम.डी सह नितीन करीर साहेब वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव मंत्रालय, दीपक कपूर साहेब सचिव जलसंपदा मंत्रालय व सह इतर अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते

   आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश येऊन ४२ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास या परिसरातील शेतकऱ्यांतून व्यक्त केला जात आहे

News Category: 
Maharashtra

Sharing