वसमत येथील दोन तरुणांकडून घातक शस्त्र जप्त

वसमत (प्रतिनिधी)
हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणासाठी सुरू असलेल्या मोहिमेत हिंगोली एलसीबीने शनिवारी वसमत येथील दोन तरुणांकडून एक घातक शस्त्र जप्त केले आहे.  

27 मे रोजी दुपारी 3 वाजता हिंगोली एलसीबीने आरोपी अविनाश अनिल गायकवाड याच्या वसमत शहरातील शुक्रवार पेठेतील घरावर छापा टाकून आरोपीला तलवारीसह रंगेहात पकडले. दुसऱ्या कारवाईत आरोपी राहुल सुनील डाके याच्या घरावर छापा टाकून आरोपीला तलवारीसह रंगेहात पकडण्यात आले. 

या प्रकरणी एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी शनिवारी सायंकाळी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम 4/25 अन्वये बसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे
पो.नि.चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.भोपे पुढील तपास करीत आहेत.

Sharing