गरजू विद्यार्थ्यांचे देवदूत सम्यकचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचा 'महाराष्ट्र रत्न गौरव' पुरस्काराने सन्मान

मुबंई (प्रतिनिधी)
ज्येष्ठ समाजसेवक तथा सम्यक सामजिक संस्थेचे अध्यक्ष गरजू विद्यार्थ्यांचे देवदूत प्रकाश गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ग्लोबल व्हाईस, ब्लू टायगर सामाजिक संस्था मुंबई,श्वेतगंध फाऊंडेशन डोंबिवली व परिवार सामाजिक संस्था ठाणे यांच्या वतीने ठाणे येथे 'महाराष्ट्र रत्न गौरव सन्मान पुरस्कार २०२३' देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते प्रकाश गायकवाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी अॅड. एस. एस. पवार, अभिनेत्री नयना काळे,ज्योती चिंदरकर, बाळराजे शेळके,विश्वनाथ खरात आदी उपस्थित होते. प्रकाश गायकवाड
रसायनी पाताळगंगा परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत.गरीब, गरजूंना मदत करत राजिप शाळेतील गरजू विद्यार्थ्यांनाही शिक्षणात अडचण येऊ नये,या साठी त्यांना गणवेश,दफ्तर आदींसह शालेय वस्तूंचे वाटप करत आले आहेत.
कोरोना काळात हजारो गोरगरीबांना किराणा किटचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.तसेच परिसरात पाणीटंचाई निर्माण झाल्यास स्वखर्चाने पाणी देण्याचे काम ते करत आले आहेत. त्यांच्या या साऱ्या कार्यांची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्यात आला असून, या पुरस्काराबद्दल सध्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे