जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्य पदी मिर्झा अमजद बेग

हिंगोली (प्रतिनिधी)
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदस्य पदी मिर्झा अमजद बेग यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे
जिल्हा ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 7 व 8 नुसार ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी हिंगोली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्याकरीता १८ मे २०२३ रोजी एकूण २० अशासकीय सदस्यांची ३ वर्षा करिता नियुक्ती करण्यात आली असून मिर्झा अमजद बेग यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे या बाबतचे पत्र जिल्हाधिकरी हिंगोली जितेंद्र पापळकर यांनी काढले आहे
मागील कार्यकाळात मिर्झा अमजद बेग यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची फेर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे