वाहतुकीच्या नियमाबाबत महामार्ग पोलिसांची जनजागृती

हिंगोली (प्रतिनिधी)
आज दिनांक 01 रोजी एन एच- 161 हिंगोली - वाशिम महामार्ग वरील कलगाव पाटी रोडवर
वाहतुकीच्या नियमाबाबत नागरिकांना माहिती देत महामार्ग पोलिसांनी जनजागृती केली
मा.अपर पोलीस महासंचालक (वा) श्री रविंद्र कुमार सिंगल,मा.पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र डॉ. श्रीमती जमादार मॅडम, तसेच नांदेड विभागाचे पो. नि. श्री केंद्रे सर यांचे मार्गदर्शनाखाली वाहन चालकांना मार्गदर्शन केले त्यांना वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला सदर वेळी त्यांना
वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये,
वाहनाचे कागदपत्र सोबत ठेवणे,दारू पिऊन वाहन चालू नये,ट्रिपल सीट प्रवास करू नये,मोटर सायकल चालविताना हेल्मेटचा वापर करावा,वेग मर्यादाचे पालन करावे,ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे,चालक परवाना आवश्यक आहे,मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत समजावून सांगितले,वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर टाळावा,वाहनांवर विशेषतः पाठी मागील बाजू रिफ्लेक्टर लावावे, महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये,वाहन चालविताना वेग मर्यादाचे पालन करावे,वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचना प्रमाणे वाहन चालवावे,चारचाकी वाहन चालवताना चालक तसेच सर्वच प्रवाशांनी सीटबेल्ट वापरावे,वाहन चालवताना समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन वाहन चालवावे कारण समोरील वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने पाठी मागील वाहनाने समोरील वाहनास धडक दिल्याने घटणाऱ्या अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे,ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म.पो.केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत. याबाबत मार्गदर्शन करुन मृत्युंजय दूत संकल्पनेची सविस्तर माहिती देण्यात आली,
मोटर सायकल स्वार तसेच जड वहान चालकांना वाहने चालविताना घेण्याबाबतची काळजी व खबरदारी तसेच स्वतःची व दुसऱ्याची हानी होणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत.
या वेळी एकूण चालक,प्रवासी उपस्थित होते. उमर शेख, पोलीस उप निरीक्षक,पोना,सोपान थिटे,प्रवीण राठोड, गजानन तायडे, असीम शेख, देविदास ढाकणे,रवी बांगर आदी उपस्थित होते