अन....उपविभागीय अधिकाऱ्याने सवतः हा चालवला जे.सी.बी,कुरुंदा पूर नियंत्रणासाठी प्रशासकीय स्तरावरील कामे युद्ध पातळीवर सुरु


वसमत (प्रतिनिधी)
आसना नदीच्या काठी वसलेल्या कुरुंदा पूर नियंत्रणासाठी चालू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी वसमत व दत्तात्रय सावंत कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग नांदेड यांनी काम करणाऱ्याला प्रोत्साहन मिळून कामाला गती मिळावी म्हणून चक्क जे.सी.बी.चालवला व काम करणाऱ्या सर्व टीमला प्रेरणा दिली.
आसना नदीतील गाळ उपसून नदी रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी आज दिनांक ६ जून रोजी दोन्ही अधिकाऱ्यांनी आपापल्या यंत्रणेला सूचना दिल्या.नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सामोपचाराने घेऊन गावाला पुरापासून वाचवावे व गाळ आपल्या शेतात नेऊन गाळयुक्त शिवार करून आपले उत्पादन वाढवावे या साठी शेतकऱ्यांच्या बांधावर व नदीच्या पात्रात उतरून ही चळवळ लोक चळवळ करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
राहिलेली कामे मोसमी पाऊस सुरू होण्याच्या अगोदर संपवण्यासाठी या यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या पूर्ण नदी पात्रात पायी फिरून कामाची पाहणी करण्यात आली.तसेच धनंजय पोटे वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण यांनीही भेट देऊन वृक्षारोपण करून नदीच्या काठी जैविक भिंत करण्यासंदर्भात पाहणी केली.
आसना नदीला अमृतवाहिनी बनवून कुरुंदा गावाला पुरापासून वाचवण्यासाठी सर्व कुरुंदेकर मंडळी एका जागी येऊन जोमाने कामाला लागली आहेत. प्रत्येक जण या बाबतीत सकारात्मक होऊन गावासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहे
डॉक्टर सचिन खल्लाळ कुरुंदा पूर नियंत्रण प्रक्रियेसाठी जातीने लक्ष घालून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करीत आहेत यापूर्वी त्यांनी वसमत शहरातील गुरुद्वारा परिसरातील तलावा मधील गाळ काढून ते स्वच्छ केल्याचे उदाहरण वसमतकरांनी पाहिलेले आहे
आज सदर कामाच्या पाहणीवेळी डॉक्टर सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी वसमत, दत्तात्रय सावंत कार्यकारी अभियंता नांदेड आसना नदी समन्वयक तान्हाजीराव भोसले,जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, कुरुंदा गावचे सरपंच राजेश इंगोले, सह्याद्री देवराईचे मंगेश दळवी, मंडल अधिकारी आनंद शिंदे ,तलाठी प्रेम गरुड भूमि अभिलेख अधिकारी सांगवीकर व त्यांची टीम ग्रामसेवक पवार ,गणेश दळवी मानकरी, एकनाथ इंगोले, अशोक दळवी फुलाजी इंगोले गणेश वटमे कमलाकर भद्रे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.