वॉटसअँप ग्रुप वर हिंदु व मुस्लीम समाजात शत्रुत्व निर्मान करण्याचा प्रयत्न,वसमत शहर पोलिसांची तात्काळ कार्यवाही, आरोपीस ९ जुन पर्यत पोलीस कोठडी

वसमत (प्रतिनिधी) वॉटसअँप ग्रुप वर हिंदु व मुस्लीम समाजात शत्रुत्व निर्मान होण्याच्या उद्देशाने मुस्लीम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ व प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांचे बाबत वादग्रस्त मचकुराची पोस्ट टाकुन मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी वसमत न्यायालयाने एकास ९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अशोक दिंगंबर जिंतूरकर रा.सोमवार पेठ वसमत यांनी स्वतः हा च्या मोबाईल वरुन सोमवारपेठ मित्र परिवार या वॉटसअँप ग्रुप वर हिंदु व मुस्लीम समाजात शत्रुत्व निर्मान होण्याच्या उद्देशाने मुस्लीम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण व मोहम्मद पैगंबर साहेब यांचे बाबत वादग्रस्त मचकुराची पोस्ट टाकुन मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्या व त्यानी टाकलेली पोस्ट डिलीट करुन पुरावा नष्ट केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला
दरम्यान सदर बाब ग्रुप मधिल सदस्यांनी पाहिली व त्या वादग्रस्त पोस्टचे स्क्रीन शॉट घेऊन शहर पोलीस स्टेशन गाठले ही बाब वा-या सारखी पसरली
माजी नगर सेवक शेख हबीब शेख बशीर,मुजीब सम्राट,नदीम सौदागर,शेख अय्युब पॉपुलर,शेख अलीमोद्दीन,ऎड शेख मोहसीन,ऎड शेख अजरोद्दीन,शेख शाहेद, एन.आय.पठाण,इम्रान फारोखी,अब्दुल सत्तार, शेख रशीद सह असंख्य जनसमुदाय पोलीस ठाण्यात दाखल झाला
या वेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी जमावांला विश्वासात घेऊन चर्चा केली व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले व फौजदार भोसले,शेख हकीम,संदीप जोंधळे आदींचे पथक पाठवून जिंतूरकर याना तात्काळ ताब्यात घेतल्याने जमावाने पोलीस विभागाचे आभार मानले
या प्रकरणी फिर्यादी फौजदार सदानंद तुळशीदास मेंडके यांच्या फिर्यादीवरुन अशोक डिंगबर जितुरकर विरुद्ध
गु.र.नं. व कलम २९७,/२०२३ कलम १५३ (अ),२९५ (अ),२०१ भा.द.वी.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आज बुधवारी त्यांना वसमत न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि महिपाळे करीत आहेत
-----------------------------
सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाई - पो.नि कदम
जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनात सायाबर विभाग सक्रिय असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात द्वेष निर्माण करून शहराची कायदा,सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध योग्य कार्यवाही करण्याचा इशारा पो.नि.चंद्रशेखर कदम यांनी प्रसार माध्यमातून दिला आहे