वसमतला निषेध मोर्चा काढल्या प्रकरणी गुन्हे दाखल

वसमत (प्रतिनिधी)
गुरुवारी वसमत शहरात 
गैरकायद्याची मंडळी जमवुन विना परवाना निषेध मोर्चा काढुन निदर्शने केल्या प्रकरणी १७ जणांसह इतर २० ते ३० जणांवर विविध कलमानवये वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की 
मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांचे आदेश जाक्र. २०१९ / डि.सी.१ कावी.दि/ २०.०६.२०२३ अन्वये मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश जिल्ह्यात लागु असल्याचे माहित असतांना देखील लेखी आदेशाचे उल्लंघन करुन काही जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन गुरुवारी सकाळी वसमत शहरातून विना परवाना निषेध मोर्चा काढुन निदर्शने केले व मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पो.ह संदिप भागोजी जोंधळे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिलेल्या फिर्यादीवरुन  १) गजानन भोकरे २) कपिल नवघरे रा.बाभुळगाव ३) विशाल गौरिशंकर साखरे,४) व्यंकटेश ज्ञानेश्वर पवळे रा. राजापुर,५) शिवा शंकर अप्पा साखरे, ६) राजु बापुराव कोरडे,७) साई शंकेवार,८) श्रीकांत जाधव रा.वाखारी ९) प्रल्हाद रामकिशन इप्पर ),१०) परमेश्वर अप्पा चन्ने, ११) राजु गव्हाने रा.भोगाव,१२) पवण डाखोरे रा.पळसगाव, १३) सोपान चव्हाण रा. किन्होळा,१४) अनिकेत बालाजी व्यवहारे,१५) मारोती गोविंदराव वाघ, १६) महादु संभाजी आवरदे १७) वैभव सूर्यवंशी रा. पांढरी असे १७ जणांसह ईतर २० ते ३० जणांवर गुरन ३३४/२०२३ कलम १४३,१८८ भादवि सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सदानंद मेंडके करीत आहेत

------------------------
मा.जिल्हाधिकारी हिंगोली यांचे जमावबंदी आदेश लागू असल्याने मोर्चा काढण्यास मनाई असल्याबाबत पोलीस विभागाने आयोजनकाना बैठकीत सूचना दिल्या होत्या या वेळी आयोजकांनी मोर्चा काढणार नसल्याचे आश्वासन दिले व मोर्चा काढला यामुळे आदेशाचे उलंघन केल्या प्रकरणी संबंधितावर सदरचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक वसमत शहर चंद्रशेखर कदम यांनी प्रसार माध्यमातून दिली आहे

Sharing