पूर्णा च्या २१ जागेसाठी ५० उमेदवार रिंगणात,  शेतकरी विकास पैंनल व शेतकरी विकास परिवर्तन पैंनल मध्ये सरळ लढत

वसमत (प्रतिनिधी)
पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी १८० पैकी १३० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २१ जागेसाठी ५० उमेदवार शिल्लक राहिले असून शेतकरी विकास पैंनल व शेतकरी विकास परिवर्तन पैंनल मध्ये सरळ लढत होणार आहे

पूर्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत
वसमत गटात ३ जागा, चुडावा गट ३, पूर्णा गट ३, जवळा बाजार ३, वडगाव- साडेगाव गट ३, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन १ जागा, अनुसूचित जाती जमाती १ जागा, महिलासाठी राखीव २ जागा,इतर मागासवर्ग १ जागा, विभक्तजाती-भटक्या जमाती व विशेष- मागास प्रवर्ग १ जागा, अशा एकूण २१ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे

आज शेवटच्या दिवशी १८० पैकी १३० उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २१ जागेसाठी ५० उमेदवार शिल्लक राहिले असून  शेतकरी विकास पैंनल व शेतकरी विकास परिवर्तन पैंनल या दोन प्रमुख पैंनलमध्ये सरळ लढत होणार आहे ९ जुलै रोजी मतदान होणार असून,११ जुलै रोजी मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार आहे.

जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे आहे

१) श्री जयप्रकाश दांडेगावकर
२) चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे
३) शंकरराव इंगोले
४) बबनराव बेंडे
५) श्रीधरराव पारवे
६) भगवानराव धस
७) डॉक्टर सुनील कदम
८) शहाजी देसाई
९) गजानन धवन
१०) विश्वनाथ फेगडे
११) बाळासाहेब बारहाते
१२) प्रल्हादराव काळे
१३) सुरेश राव आहेर
१४) चांदु इंगोले
१५) गजानन सवंडकर
१६) नितीन महागावकर
१७) अंजनाबाई झुंजुर्डे
१८) हरिभाऊ शेळके
१९) ज्ञानोबा वंजे
२०) किशन देशमाने
२१) सौ मनीषा चव्हाण

तर भाजपा महिला जिल्हाध्यक्ष  सौ.उज्वलाताई तांभाळे व माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा,माजी मंत्री गणेशराव दुधगावकर,भाजपा नेते श्रीकांत देशपांडे (नाना) यांच्या नेतृत्वाखालील 
शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे 
 
१) डॉ.पार्डीकर धोंडीराम बालासाहेब
२)साबणे राधाकिशन गोविंदराव
३)ढोरे प्रल्हाद पांडुरंग
४)देसाई व्यंकटराव दतराव
५)वाघ नरहरी ठकाराम
६)सूर्यवंशी बालाजी पुरभाजी
 ७)शिंदे नागनाथ बापुराव
८)इंगोले भगवान शंकरराव
९)कदम लक्ष्मीकांत गंगाराम
१०)चव्हाण हनुमान मारुती
११)जाधव रंगनाथ व्यंकटराव
१२)ढोबळे त्र्यंबक नामदेव
१३)देशमुख शिरीष सूर्यभान
१४)काळे राजेश मधुकर
१५)कदम नाथराव तातेराव
१६)करवंदे आनंद लिंबाजी
१७) तांभाळे उज्वलाताई विजयप्रकाश
१८)पारवे संगीता अच्युतराव
१९)देशमुख शिवसांभ व्यंकटराव
२०)बनसोडे आनंत पांडुरंग

या दोन्ही पैंनलच्या ४१ उमेदवारासह ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत
यात माजी नगराध्यक्ष अब्दुल हफिज सह अनेकांचा समावेश आहे

News Category: 
Basmat

Sharing