वीरशैव लिंगायत वाणी समाज युवक अध्यक्षपदी गोविंद एजगे

वसमत (प्रतिनिधी)
येथील काळी पेठ भागातील युवा नेतृत्व गोविंद एजगे यांची वीरशैव लिंगायत वाणी समाज युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
प्रसाद मंगल कार्यालय येथे वीरशैव लिंगायत वाणी समाज युवक शहराची कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली यात वीरशैव लिंगायत वाणी समाज युवक अध्यक्षपदी गोविंद एजगे,उपाध्यक्षपदी गजानन डिडुलकर,सचिव शिवकुमार येणे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशैव लिंगायत समाज तालुका अध्यक्ष तथा शिक्षण व अर्थसभापती महादेव अप्पा एकलारे हे होते तर ता.शहर अध्यक्ष विजयकुमार मुटकुळे, शिवहरअप्पा नरवाडे, नाईकवाडे, विठ्ठल खाकरे, यांच्या पमुख उपस्थितीत सर्वानुमते नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली
या वेळी वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील आकाशे,प्रणव बेले यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी मुटकुळे यांनी केले
नूतन कार्यकारिणीने मठाधिपती श्री दिगंबर शिवाचार्य महाराज १०८ व गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले