मयत शेतकऱ्याची बनावट स्वाक्षरी करून अनुदान लाटले,कुरेशी मोहल्ला येथील एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वसमत (प्रतिनिधी)
मयत शेतकरी अब्दुल कादर मौलाना कुरेशी यांची बनावट स्वाक्षरी करून दि मध्यवर्ती बँकेतील ९ हजार रुपयाचा दुष्काळ अनुदान उचलून फसवणूक केल्या प्रकरणी मयताचे भाऊ अब्दुल रजाक मौलाना कुरेशी यांच्या विरुद्ध वसमत शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अधिक माहिती अशी की मयताचा मुलगा अब्दुल हमीद अब्दुल कादर यांनी शहर पोलीसात फिर्याद दिली की माझे वडील अब्दुल कादर व चुलते अब्दुल रजाक कुरेशी हे सख्खे भाऊ आहे यांची मौजे नसरतपूर तालुका वसमत येथे शेत जमीन गट नंबर २३ व २५ मध्ये सामायिक क्षेत्र जमीन आहे दोघांच्या नावाने एकूण १८ हजार रुपयाचे दुष्काळ अनुदान बँकेत जमा झाले परंतु माझ्या वडिलांचे निधन झालेले असतानाही माझे चुलते अब्दुल रजाक मौलाना कुरेशी यांनी माझ्या वडिलांचे बनावट दस्तावेज तैयार करुन त्यांची बनावट स्वाक्षऱ्या करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माझ्या वडिलांच्या नावावर असलेले दुष्काळ अनुदान निधीचे ९ हजार रुपये परस्पर उचलून घेतले व आमची व बँकेची फसवणूक केल्याची तक्रार दिली
सदर फिर्यादीवरून आज शनिवार रोजी अब्दुल रजाक कुरेशी यांच्या विरुद्ध कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुरेश भोसले करीत आहेत