वसमत येथील थोरलामठ येथे धाडसी चोरी,रोख,सोन्याचे दागिने सह 26 लाखाचा मुद्देमाल पळवला,पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

वसमत (प्रतिनिधी)
वसमत येथील थोरला मठातुन रोख रक्कम, चोन्याचे दागीने व महाराजांची महत्वाचे कागदपत्रे असा एकुण 26,02,000 रुपयाचा मुद्देमाल अप्रामाणिकपणे  फोडुन चोरुन नेल्या प्रकरणी आरोपी कमलेश महारुद्र स्वामी वय 19 वर्ष, व्यवसाय मजुरी,रा. बसवेश्वर नगर,वसमत जि. हिंगोली याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या प्रकरणी जितेंन्द्र उर्फ गणपत हरीहर महाजन वय 39 वर्षे व्यवसाय शेती रा.कुरुंदा यांनी गुरुवारी दुपारी वसमत शहर पोलिसात फिर्याद दिली की आरोपी कमलेश महारुद्र स्वामी वय 19 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. बसवेश्वर नगर, वसमत जि. हिंगोली दि.25.07.203 रोजी रात्री 01.00 ते 08.00 वा.सु.श्री.ष.ब्र. 108 श्री वेदाताचार्य दिंगबर शिवाचार्य महाराज थोराला मठ येथील पहील्या मजल्यावरील शेवटच्या रुममध्ये ठेवलेले कपाटातुन मठाच्या भक्तांची अनामत रक्कम रुपये 11,00,000 रुपये (अकरा लाख रुपये ),
 वेळोवेळी भक्तांनी दान स्वरुपात दिलेली रक्कम रुपये 8,32,000 (आठ लाख बत्तीस हजार रुपये ),
भक्तानी दान स्वरुपात दिलेले सोन्याची दागीने अंगठी व लॉकेट स्वरुपात एकुण 67 तोळे एकुण
किंमत 6,70,000 (सहा लाख सत्तर हजार रुपये ),
महाजांचे पाकीट की ज्यामध्ये त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड, एसबीआयचे एटीएम कार्ड व रुममधील ऍपल कंपनीचे आयपॅड असा एकूण 26,02,000 (सव्वीस लाख दोन हजार रुपयांचा) मुद्देमाल वर नमुद तारीख वेळी व ठिकाणी यातील नमूद चोरट्याने मठातुन चोरून नेल्याचे फिर्याद दिली या प्रकरणी आरोपी कमलेश महारुद्र स्वामी विरुद्ध विविध कलमांनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आरोपी कमलेश स्वामी यास ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पि.सी.बोधनापोड यांनी दिली आहे

प्रकरणांचा पुढील तपास उपविपोअ श्री. संदीपण शेळके,पोनि चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि.पि.सी बोधनापोड करीत आहेत

News Category: 
Basmat

Sharing