वसमत न.प.मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी विरोधात गाढव मोर्चा,घरकुलासाठीचे आगळे वेगळे आंदोलन चर्चेत

वसमत (प्रतिनिधी)
घरकुल योजनेचा लाभ धनदांडग्या लोकांना देऊन लाखोंचा अपहार केल्याचा आरोप करत सोमवारी  मुख्याधिकारी नगरपरिषद वसमत व गटविकास अधिकारी वसमत यांच्या विरोधात भव्य गाढव मोर्चा काढण्यात आला 

या वेळी भीमशक्ती संघटने कडून उपविभागीय अधिकारी कार्यालयास देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की पंचायत समिती कार्यालय वसमत आणि नगरपरिषद वसमत या दोन्ही कार्यालयामध्ये रमाई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास घरकुल योजना हि धनदांडग्या लोकांना देऊन लाखोंचा अपहार केल्याचा उपक्रम गटविकास अधिकारी,वसमत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,नगरपरिषद वसमत यांनी केल्याचा दिसून येत आहे.

सदरील दोन्ही योजनेचा गरजुवंत लाभार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वसमत आणि नगरपरिषद वसमत यांना वारंवार तोंडी व लेखी निवेदने सादर करून देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाहीत. प्रस्तापितांच्या,राजकीयांच्या सांगण्यावरून या दोन्ही योजना अमलात आणण्याचा उपक्रम केला जात आहे.त्यामुळे गरजुवंत लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहेत.त्याकरिता दोन्ही घरकुल योजनेमध्ये आवश्यक,गरजुवंत अश्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा तसेच तालुक्यातील सावंत बोरी,भोगाव,धानोरा, करंजी,किन्होळा,हट्टा, कळंबा,बळेगाव येथील रमाई आवास घरकुल योजनेमध्ये नव्याने नावे समाविष्ठ करून गरजुवंत लाभार्थ्यांना घरकुल देण्यात यावे,
नगर परिषद वसमत मधील नसरतपूर,सिराज कॉलोनी,  येथील रमाई आवास योजना मध्ये नव्याने गरजुवंत लाभार्थ्यांचे नावे समाविष्ट करून घरकुल देण्यात यावे,

सावंत बोरी येथील दलित वस्ती मधील निधी इतरत खर्च करणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंच यांची खाते निहाय चौकशी करून  गुन्हा दाखल करण्यात यावा.आदी मागण्यासाठी व घरकुल योजनेत निष्काळजी पणा दाखवणा-या अधिका-यांचा निषेध म्हणून आज 14 ऑगस्ट गाढव मोर्चा काढण्यात आला या वेळी गाढवांच्या पाठीवर सदर विभागाच्या विभाग प्रमुखांची नावे लिहून पाट्या लावण्यात आल्या वसमतकरांच्या या आगळ्यावेगळ्या मोर्चाची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे

सदरील मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे

निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे पदाधिका-यांच्या साक्ष-या आहेत

News Category: 
Basmat

Sharing