वसमतच्या जुन्या भागात विविध विकास कामासाठी १६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर,मुस्लिम बांधवाच्या मागणीला आ.राजुभैय्या नवघरेंचा प्रतिसाद,शादीखाना,ईदगाह,कब्रस्तान सरंक्षण भिंत,रस्ते कामासाठी १६० लक्ष रुपयांचा निधी

फेरोज पठाण (संपादक)
वसमतचे विकासप्रिय आमदार राजु नवघरे यांच्या प्रयत्नाने वसमत शहराच्या जुन्या भागात शादीखाना बांधकामांसाठी १ कोटी रुपये तर ईदगाह,कब्रस्तान संरक्षणभिंत,कब्रस्तान नाला बांधकाम,रस्ता या साठी ६० लक्ष निधी असा एकूण १६० लक्ष रुपयांचा निधी  मंजुर झाला आहे

वसमत शहरातील जुनी वसाहत असलेल्या शुक्रवारपेठ भागातील नागरिकांना लग्न समारंभ व कार्यक्रमासाठी कोणतेही मोठे शादीखाना - मंगल कार्यालय नसल्याने त्यांना आपल्या पाल्यांच्या लग्न समारंभ,कार्यक्रमासाठी शहराचे एक टोक शुक्रवारपेठ पासून दुसरे टोक कारखाना रोडवरील शादिखाने,मंगलकार्यालया पर्यंत यावे लागत असे यामुळे वधु-वर पित्यांना अनेक अडचणी येत होत्या शिवाय समारंभासाठी येणा-या पाहुण्यांची ही चांगलीच दमछाक व्हायची  
या मुळे नागरिकांनी जुन्या शहरी भागातच शादिखाना बनवण्याची मागणी आ.राजु भैय्या नवघरे यांच्याकडे केली होती  मागणीची दखल घेत त्यांनी लोकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या शुकरवरपेठ भागात 'मुस्लिम शादिखाना' बांधकाम कामांसाठी प्रयत्न चालवले व त्यांच्या प्रयत्नांना यश ही आले शासनाच्या वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंंतर्गत शादिखाना बांधकामासाठी १ कोटी रुपयांचा निधि मंजुर झाला आहे तसेच वसमत शहरातील प्रमुख ईदगाह,कब्रस्तान संरक्षण भिंत बांधकाम,
कब्रस्तान नाला बांधकाम,
मोठा तलाव हजरत चिमणशाह वल्ली रस्ता करणे या साठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे 
अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेले समाजाचे हे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत
-----------------------------

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - आ.नवघरे

वसमत विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून मतदार संघात नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी भविष्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मतदार संघात खेचून आणण्याचा विश्वास आमदार राजू नवघरे यांनी गौरव महाराष्ट्राचा शी बोलताना व्यक्त केला आहे
---------------------------
शादीखाना साठी मस्जिद समितीने दिली जागा देण्याची सहमती -

लग्न सोहळा व विविध समारंभासाठी परिसरातील समाज बांधवांची होत असलेली अडचण व त्यांची मागणी लक्षात घेता शुक्रवारपेठ भागातील प्रसिद्ध पंजा मस्जिद समितीने मस्जिदच्या पाठीमागे असलेली जवळपास ८०×१६० फूट ची जागा शादिखान्यासाठी उपलब्ध करुन देण्याची सहमती दिली असल्याची माहिती मा.नगरसेवक तथा मस्जिद समितीचे अध्यक्ष हाजी खैसर अहेमद यांनी दिली आहे
------------------------------
स्थानिक नागरिकांचे प्रश्न सुटणार 

आ.राजु नवघरे यांच्या प्रयत्नातुन शुक्रवार पेठ भागात अत्यावश्यक असलेला शादीखाना निर्मितीचा प्रश्न मार्गी लागल्यास लग्न कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिकांचे प्रश्न सुटून त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे हारुण दालवाले यांनी दिली आहे

News Category: 
Basmat

Sharing