आ.चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांचा मतदारसंघात विकासाचा धडाका, मतदारसंघातील प्रत्येक गावांतर्गत मूलभूत सुविधां पोहचवण्याचे ध्येय,विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी

फेरोज पठाण (संपादक)
वसमत विधानसभेचे  आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावांतर्गत मूलभूत सुविधां पोहचवण्याचे ध्येय डोळयासमोर ठेऊन मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरु केला आहे मतदारसंघातील प्रत्येक गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामासाठी पहिल्या टप्यात १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे उर्वरित दुसरा आणि तिस-या टप्यातील निधीही लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती आ.राजुभैय्या नवघरे यांनी गौरव महाराष्ट्राचा शी बोलताना दिली आहे

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच  प्रत्येक गावातील सौंदर्यात भर पडावी त्या अनुषंगाने समाजातील सर्व घटकासाठी सांस्कृतिक सभागृह असावे अशी संकल्पना आमदार राजू भैया नवघरे यांनी व्यक्त केली होती त्यासाठी शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा केल्याने ती संकल्पना प्रत्यक्ष अमलात येत आहे या साठी पहिल्या टप्यात खालील ठिकाणी सभागृह बांधकामासाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे

1) दगडपिंपरी / गुंज तालुका वसमत अण्णाभाऊ साठे सभागृह, 
2) बाभुळगाव तालुका वसमत सांस्कृतिक सभागृह,
3) काळापाणी तांडा तालुका औंढा सांस्कृतिक सभागृह,
4) शिरड शहापूर तालुका औंढा राम मंदिर सभागृह,
5) टेंभुर्णी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, 
6) अंजनवाडी तालुका आँढा सांस्कृतिक सभागृह,
7) कानोसा तालुका वसमत बाळूमामा मंदिर परिसरात सभागृह,
8) चिखली तालुका वसमत सांस्कृतिक सभागृह,
9) चोंडी शहापूर तालुका औंढा आदिवासी समाज समाज मंदिर,
10) जवळा बाजार तालुका औंढा बसवलिंग मठ परिसरात सभागृह, 
11) जोड पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह,
12) टेंभुर्णी माळी समाज सभागृह,
13) देवताळा तालुका औंढा सांस्कृतिक सभागृह,
(14) धार तालुका औंढा सांस्कृतिक सभागृह,
15) पवार तांडा तालुका औंढा सांस्कृतिक सभागृह,
16) ब्राह्मणगाव बुद्रुक तालुका वसमत महादेव मंदिर सभागृह,
17) मोहगाव तालुका वसमत सांस्कृतिक सभागृह,
18) रांजळा तालुका औंढा सांस्कृतिक सभागृह,
19) रुपुर तालुका औंढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह,
20) रुपुर तांडा तालुका औंढा सांस्कृतिक सभागृह,
21) लक्ष्मण नाईक तांडा तालुका औंढा संत सेवालाल सांस्कृतिक सभागृह होणार आहे

तसेच विविध गावांमध्ये मंदिरासमोर पेवर ब्लॉक,गावांतर्गत सी.सी रोड,जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत,विद्युतीकरण सोलार पंप,बोराळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शेजारी सुशोभीकरण,पुलाचे बांधकाम,सातेफळ येथे बायपास रस्ता करणे,हिवरा खुर्द येथे शाळेला वॉटर फिल्टर बसवणे इत्यादी कामासाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रसिद्धी विभागाने दिली आहे

 

News Category: 
Basmat

Sharing