मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी व कुरूंदा स्मशानात उपोषण सुरू, दोन्ही उपोषणास सकल मुस्लिम समाजाचा जाहीर पाठींबा


वसमत (प्रतिनिधी)
जालना जिल्हातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास व कुरूंदा स्मशानात सुरू असलेल्या उपोषणास जाहीर पाठींबा देत मराठा समाजास ओबीसी (OBC) प्रर्वगातुन आरक्षण देण्याची मागणी सकल मुस्लिम समाज कुरुंदा यांनी केली असून
शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांना पत्र देऊन समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे
पत्रानुसार जालना जिल्हातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी उपोषणास बसले आहेत. पण प्रशासनाच्या वतीने त्यांचे उपोषण दाबण्यासाठी त्या ठिकाणी अमानुषपणे युवकांवर,महीला, वृध्द व लहान बालक यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला त्या बद्दल सर्व मस्लीम समाज बांधवाच्या वतीने सदरील घटनेचा जाहीर निषेध तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या व कुरूंदा येथील सात मराठा बांधव जे स्मशानात अमरण उपोषणास बसले आहेत त्यांच्या उपोषणास जाहीर पाठींबा आणि विदर्भातील कुणबी व मराठवाडयातील मराठा समाज दोन्ही एकच आहेत त्यामुळे राज्य शासनाने सकल मराठा समाजास सरसकट ओबीसी (OBC) प्रर्वगातुन मराठा - कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून आरक्षण जाहीर करावे व त्यासाठी आवश्यक असणारी कार्यवाही पुर्ण करून मराठा समाजास तात्काळ ओबीसी (OBC) प्रबंगातुन मराठा कुणबी जातीचे दाखले देण्यासाठीचा अध्यादेश काढण्यात यावे अशी मागणी लेखी पत्रात करण्यात आली आहे