बैंकेच्या सभासदांचा विश्वास आमच्यासाठी ऊर्जा स्त्रोत - शिवदास बोड्डेवार, शिवेश्वर बँकेची ठेवी 180 कोटी तर कर्ज वाटप 105 कोटी, सभासदांना 10 टक्के लाभांश

वसमत : (प्रतिनिधी) : मागील पंधरा वर्षापासून बँकेचा कारभार चालवत असताना बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांनी ठेवी स्वरूपात दाखवलेला विश्वास आमच्यासाठी ऊर्जा स्त्रोत असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना केले आहे
शनिवार दि. 09 सप्टेंबर रोजी श्री. शिवेश्वर बँकेची 28 वी वार्षीक सर्वसाधारण सभा बँकच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी सभासदांशी बोलतांना बोड्डेवार यांनी लवकरच नांदेड येथे बँकेच्या दोन नवीन शाखा उघडणे व वसमतला स्वतःहा च्या जागेत बँकेची इमारत उभी करण्याचा संकल्प बोलून दाखवला तसेच बँकेला दि. 31 मार्च 2023 अखेर 1 कोटी 20 लाख 95 हजार नफा झाल आहे. तर बँकेच्या ठेवी 180 कोटी 09 लाख 27 हजार, कर्ज वाटप 105 कोटी 50 लाख 72 हजार, गुंतवणूक 45 कोटी 42 लाख 67 हजार, राखीव व ईतर मिधी, 1 कोटी 45 लख 42 हजार तर भाग भांडवल रुपये 7 कोटी 10 लाख 66 हजार व 31 मार्च 2023 अखेर ऑडीट वर्ग 'अ' मिझल असल्याचे सभेत मांडले. तसेच सभासदांना या वर्षी 10% प्रमाणे लाभांश जाहिर केला आहे
या वेळी बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय दलाल,विनोद, झंवर,बालासाहेब जाधव, नागनाथ कोम्पलवार, लक्ष्मीकांत कोसलगे, वसंत चेपुरवार,शेख मोईनोद्दीन संदलजी,भारत नामपल्ली, नारायण लासीनकर, बालाजी माळवदकर,डॉ. धोंडीराम पार्डीकर, राधाकिशन साबणे, सौ. शकुंतला देवी,सौ.रुपाली दगडु, अँड.दिपक कट्टेकर, रमाकांत भागानगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी किशन पानधोंडे, सरव्यस्थापक संजीव बेंडके,रघुत्तम पांडे, संदिप पाटील, रामराव नपते,गणेश गरुड, ताजपाज्ञा पठाण,शिवानंद सोनखे,संतोष परसवाडे, अक्षय जाधव, सुनिल टाक, अक्षय कट्टेकर आदि कर्मचारी,सभासद,ग्राहक उपस्थित होते.प्रास्ताविक जिला सहकार बोर्डाचे सुदाम लुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन बँकेचे संचालक बालासाहेब जाधव यांनी केले.