वसमत गुलशन नगर भागातील "त्या" बहुचर्चित खुन खटल्यातील दोन आरोपीना जन्मठेप.

वसमत (प्रतिनिधि)
वसमत शहरातील कारखाना रोड गुलशन नगर भागातील बहुचर्चित अंडेवाले कुटुंबातील सुनाच्या खून खटल्यात पति व दिरास आज वसमत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

   अधिक माहिती अशी की आरोपी अब्दुल रहेमान गुलाब रहेमान,आरेफ गुलाम अहेमद (अंडेवाले) व इतर यांनी फिर्यादी महमद खलील महमद शिकर यांची मुलगी व आरोपी अब्दुल रहेमान हिची पत्नी सलमा हिला शारिरीक व मानसिक त्रास देऊन पैश्याची मागणी करून सलमा हिचा गळा दाबुन खुन केल्याची खळबळजणक घटना 2018 साली घडली होती

          त्या वरून पोस्टे हट्टा गुरनं.279/2018 कलम 498 (अ),302,34 भादंवि अन्वये दाखल होऊन सदर गुन्हयांचा तपास तत्कालीन पो.नि आर.आर.धुन्ने यांनी कसोशीने पुर्ण करून सबळ पुरावे हस्तगत करून गुन्हयांतील आरोपी यांचे विरुध्द मा.अप्पर सत्र न्यायालय वसमत यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

सद्नंतर आरोपी अब्दुल रहेमान गुलाब रहेमान व आरेफ गुलाम अहेमद यांचे विरुध्द मा.अप्पर सत्र न्यायालय वसमत येथे खटला चालुन ज्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी वकील श्री.दासरे व श्री. नायक यांनी सरकार पक्षा तर्फे योग्य युक्तीवाद केला. 

आरोपी अब्दुल रहेमान गुलाब रहेमान व आरेफ गुलाम अहेमद यांनी खुनाचा गुन्हा केल्याचे सिध्द झाल्यामुळे त्यांना मा.श्री. जयंत नी.राजे अतिरिक्त सत्र न्यायधिश, न्या.कं. 01, वसमत नगर यांनी आज दि.18 सप्टेंबर रोजी दोषी ठरवुन आरोपीस जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सदर केस सुनावणीच्या दरम्यान मा.पोलीस अधिक्षक श्री. जी श्रीधर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील मॅडम व मा. उपविपोअ संदिपान शेळके यांनी वेळोवेळी दिलेल्या विशेष सुचना व मार्गदशन प्रमाणे गुन्हयांतील साक्षीदार यांना पो.नि सी.ए.कदम,पोह बेटकर, पोशी पंतगे यांनी योग्य मार्गदर्शन करून काम पाहीले.

News Category: 
Basmat

Sharing