राजर्षी शाहू महाराज विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व पालक मेळावा उत्साहात

वसमत (प्रतिनिधी) १७ सप्टेंबर २३ रोजी राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरळ येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व पालक मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य गणेश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप भालेराव (सरपंच रिधुरा), प्रभाकर गायकवाड (सदस्य आरळ), उद्धव भालेराव,दासराव भालेराव, सुनील अंबेकर,संदीप भालेराव,सिद्धनाथ भालेराव,दशरथ जोगदंड, दिगांबर अर्धापुरकर, राजाराम दळवे,मारोती भालेराव,रोहिदास लोंढे, शिवाजी भालेराव,मुंजाजी भालेराव,गणपत भालेराव, बेगाजी बेंडे,मुंजाजी वानखेडे सौ.प्रतिभा नरवाडे -सुर्यवंशी व प्रा.माया चांदणे
तर विशेष अथिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्रा.रमेश मानवते,संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभा मानवते यांची उपस्थिती होती प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी,डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
प्राचार्य गणेश काळे यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना प्रा रमेश मानवते सांगितले की विद्यार्थी गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक व पालकांची महत्त्वाची भूमिका असते तर प्राचार्य गणेश काळे आपल्या भाषणात म्हणाले की विद्यार्थी विकासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
सदरील कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यासाठी प्रा. सचिन गायकवाड,प्रा. धम्मपाल रणवीर,प्रा.पिराजी खंदारे,प्रा.हनुमान गाडेकर, शालेय शिक्षकेत्तर कर्मचारी बळीराम पारडे,प्रदीप संवडकर,भालेराव,गजानन संवडकर व शालेय विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बळीराम परडे व आभार प्रा.गणेश काळे यांनी मानले या वेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक यांची उपस्थिती होती.