प्रेषित पैगंबरांनी जगाला दिला मानवतेचा संदेश,वसमतला जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी सामाजिक एकोप्यातून साजरे

वसमत (प्रतिनिधी)
जगाला मानवतेचा संदेश देणारे प्रेषित पैगंबर हज़रत मोहम्मद (स.) यांचा जयंती  जशने-ईद- मिलादुन्नबी उत्सव व मिरवणूक
रविवारी सामाजिक एकोप्यातून मोठ्या उत्साहात साजरे झाले

तारखे प्रमाणे जशने-ईद- मिलादुन्नबी दि 29 सप्टेंबर 2023 रोजी येत असताना 
त्याच दिवशी आमच्या हिंदू बांधवांचा श्री गणेश उत्सव येत असल्याने त्यांच्या भावनांचा आदर करीत  वसमत शहरातील सामाजिक बांधिलकी, हिंदु-मुस्लिम एकोप्याची परंपरा अबाधित रहावी या उद्देशाने तसेच पोलीस विभागाच्या विनंतीवरुन हा उसत्व दि 29 सप्टेंबर 2023 ऐवजी 1 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा करण्यात आला

या निमित्त सकाळी आठ वाजता टिपू सुलतान चौक येथुन धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणूक  पारंपरिक पद्धतीने  निघणाली मिरवणूक मुख्य मार्गाने दर्गाह हजरत खान-ए- आलम येथे पोहोचली

मिरवणुकीचे रूपांतर जलसा-ए-आम मध्ये होऊन या ठिकाणी उपस्थित हज़ारोंच्या जनसमुदायास प्रमुख मुस्लिम धर्मगुरूनी प्रेषित हज़रत मोहम्मद पैगंबर (रह) यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला प्रवचन कार्यक्रमानंतर महा अन्नदानाने उत्सवाची सांगता झाला

दरम्यान माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजूभैया नवघरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतु,वसमत वकील संघाचे अध्यक्ष रणधीर तेलगोटे,प्रा.गणेश कमळू,श्रीरंग थोरात, रविकिरण वाघमारे,पत्रकार चंद्रकांत देवणे,शेख खदिर,अय्युब पठाण,खदिर अहेमद आदींनी प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी भेट देऊन समाज बांधवाना ईद च्या शुभेच्छा दिल्या

---------------------
विना बंदोबस्त ईद साजरी होऊ शकते -कदम
हजारोंच्या उपस्थितीत सामाजिक एकोप्यातून मिरवणूक व कार्यक्रम शांततेत संपन्न झाले असून पोलीस विभागाला कोणत्याही अधिक बंदोबस्ताची गरज पडली नाही ही कौतुकास्पद बाब असून भविष्यात विना पोलीस बंदोबस्तातही ईद मिलादुन्नबी कार्यक्रम संपन्न होतील असे गौरवोद्गार  पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी व्यासपीठवरून आपल्या मनोगतातून व्यक्त केले

मिरवणुकी दरम्यान समाज बांधवांनी शहरात ठीक ठिकाणी बदामशेक, बुंदी लाडू,गुलाब जामुन,नुकती पोहे,केळी सह फराळाची व्यवस्था केली होती मिरवणुकीच्या मार्गावरील नागरिक व व्यापाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक एकोप्यातून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला

जश्ने ईद -ए- मिलादुन्नबी समितीचे अध्यक्ष
मोहम्मद अतिख मोहम्मद उस्मान,उर्स समितीचे अध्यक्ष अ.हफिज अ.रहेमान, मौलाना इम्तियाज बरकाती, अहेमद भाई,एकबाल भाई,सिद्दीकी चौधरी,मो.उमर फारुख, मोहम्मद सुफियान,मुजीब दाऊद, युनूस पठाण, एखाबाल पठाण,शेख अलीमोद्दीन,ऎड.शेख मोहसीन,युनूस पॉपुलर,रशीद जानीमिया, अब्दुल सत्तार,अमजद बेग,सलीम मेमन,अमजद खान,तोहीद अफजल,शेख रशिदोद्दीन,शेख जाफर जनता,युसुफ भाई,आदिनी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या इमामी सिटी केबलने मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण  केले होते कार्यक्रमा शेवटी फेरोज शफीउल्ला पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले

News Category: 
Basmat

Sharing