सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने दिली अल्पसंख्यांक शहराध्यक्ष पदाची जबाबदारी

वसमत (प्रतिनिधी)
काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ता अब्दुल अखिल अब्दुल खादर यांना पक्षाने काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे या नियुक्तीचे पत्र गुरुवारी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूरकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले
काँग्रेसनेते माजी उपनगराध्यक्ष रियाजोद्दीन कुरेशी यांचे खंदे समर्थक असलेले अब्दुल अखिल सतत अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगती,उन्नतीसाठी पक्षाच्या आयोजित कार्यक्रमात अग्रेसर असतात अतिशय प्रेमळ व शांत स्वभाव असलेले अब्दुल अखिल समाजात सर्वपरिचित आहेत
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागचे अध्यक्ष मा.आ. डॉ. वजाहत मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वसमत शहर अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बाबतचे नियुक्तीपत्र गुरुवारी वसमतच्या जिल्हा परिषद मैदानावर आयोजित नईमोद्दीन कुरेशी प्रीमियरलीग किर्केट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अब्दुल हफिज,काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुनिर पटेल,माजी उपनगराध्यक्ष म.रियाजोद्दीन कुरेशी, काँग्रेसनेते डॉ. एम.आर.क्यातमवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे
या पुढेही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ध्येय व धोरण प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्य करावे व पक्षाची प्रतिमा उज्वल करण्याची अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे