सुनेला भांडण सासूला महागात पडलं,पोटच्या मुलाने केला आईचा घात.!,आईची हत्या करणा-या मुलास पोलिसांनी ठोकल्या बेड्या,कळमनुरी तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथील घटना

कळमनुरी (प्रतिनिधी) सासू-सून यांच्यातील घरगुती भांडणामुळे सून घरातून निघून गेल्याने संतापलेल्या मुलाने आईचा च काटा काढत त्याची हत्या केल्याची दुर्दैवी घटना कळमनुरी तालुक्यात घडली असुन 

या प्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध 18 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला  कळमनुरी तहसीलच्या दिग्रस बुद्रुक येथील रहिवासी शांताबाई विठ्ठल गायकवाड यांचा आपल्या सुनेशी झालेल्या कॊटुंबिक वादामुळे सुन घर सोडून आपल्या माहेरी गेली पत्नी माहेरी गेल्याने आरोपी विजय विठ्ठल गायकवाड हा आई शांताबाई हिच्यावर रागावला होता.

 रविवारी दुपारी शांताबाई घरातील बाथरूममध्ये आंघोळ करत असताना आरोपी विजय याने दगड व लाकडाने वार करून शांताबाईची हत्या केली. या प्रकरणी बाबुराव गायकवाड यांनी सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजयविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील,एसडीपीओ वसमत मारोती थोरात, सपोनी सुनिल गोपीनवार आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली  पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक करुन आज सोमवारी न्यायालय  समोर उभे केले असता न्यायल्याने आरोपीची न्यायालयिन कोठडीत रवानी केल्याची माहिती आहे 
प्रकरणाचा पुढील तपास फौजदार शेख माजीद तपास करीत आहेत. 
 या घटनेने संपूर्ण हिंगोली  जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे

News Category: 
Kalamnuri

Sharing