इफ्तार पार्टीतून महाऊर्जाने दिला महिलांना सक्षम, स्वावलंबी बनवण्याचा संदेश,रम़जान निमित्त शिलाई मशिन भेटीने गरजु महिलांना दिलासा



वसमत (प्रतिनिधी)
पवित्र रमजान महिन्या निमित्त महाऊर्जा संस्थे कडुन घेण्यात आलेली इफ्तार पार्टी शहरात चर्चेचा विषय बनली असुन गरजु महिलांना सक्षम,स्वावलंबी बनवण्यासाठी घेतलेला पुढाकार अनेकांसाठी आदर्श ठेवून गेला आहे
वीज वितरण विभागात अग्रगण्य असलेली महा ऊर्जा विद्युत तांत्रिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी घेण्यात येते या वर्षीही रविवारी सायंकाळी भव्य दिव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या वर्षीपासून संस्थेचे अध्यक्ष सय्यद इम्रानअली सय्यद नासरअली यांनी रोजा इफ्तार कार्यक्रमापूर्वी 15 गरजू महिलांना शिलाई मशीन भेट देऊन रमजानच्या शुभेच्छा दिल्या
गरजू व होतकरू महिलांना शिलाई सेंटरच्या माध्यमातून सक्षम,स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करीत समाजापुढे आदर्श ठेवला आहे
इफ्तार पार्टीतील वाढीव खर्च टाळून गरजूंना अशाप्रकारे मदत केली जाऊ शकते असा संदेश जणू महाऊर्जा च्या इफ्तार पार्टीतून समाजाला गेला आहे इम्रानअली यांच्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे
इफ्तार पार्टी प्रसंगी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर मा.आ. राजूभैया नवघरे,लक्षमीकांत नवघरे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू,माजी नगराध्यक्ष खालील अहेमद,शेख रफिक (कळमनुरी) माजी नगरसेवक शेख मोहसीन,सचिन दगडू,रविकिरण वाघमारे, नसीर कुरेशी,नईम कुरेशी,शेख अय्युब,वसंत चेपूरवार,प्रा.गणेश कमळू,प्रा.दीपक कातोरे,मंगेश तनपुरे, मौलाना मोबिन,शेख युनुस,शेख समद,शेख युसूफ (मिटठू भाई) वसीम कुरेशी,रफीउल्ला खान,माजिद इनामदार, अमजद खान नम्मू, अमजद बेग,सरफराज काझी,खलील चौधरी, शेख मोहसीन,इम्रान फारोखी,आयफन चाऊस,समद फारोखी, मोहसीन पठाण (एम.के) रविराज डोळस आदीं सह विविध क्षेत्रातील मान्यवर,समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते
उपस्थित मान्यवरांचा सय्यद इम्रानअली व शेख मोबीन जमीनदार महा ऊर्जा ग्रुप च्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला