कळमनुरी येथिल बहुचर्चित खुनाच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

कळमनुरी (प्रतिनिधी)
हिंगोली :- कळमुनरी येथिल बहुचर्चित खुनाच्या खटल्यातून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश हिंगोली श्रीमती.एस.एन.माने (गादेकर) मॅडम यांनी 3 एप्रिल रोजी आरोपी शेख अकबर शेख जहुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे .
या बाबतची थोडक्यात हकीकत अशीकी, फिर्यादी पो.स्टे. कळमनुरी येथे फिर्याद दिली होती कि त्यांचा मयत भाऊ शेख रऊफ यांचे आरोपी सोबत मैत्रीचे संबंध होते आरोपीने दारु पिण्याच्या कारणांवरुन देशी दारुच्या दुकाणाच्या बाजुला बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी लाकडी बल्लीने मयताच्या तोंडावर व डोक्यावर जबर मारहाण केली.
सदरील मारहाण मुळे मयत तेथेच मरण पावला अशी फिर्याद दिल्यावरुन पो.स्टे.कळमनूरी येथे पोलीसांनी गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास पूर्ण करुन आरोपपत्र मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते सदरील प्रकरणात सरकार पक्षाकडून एकून पाच साक्षिदार तपासण्यात आले. आरोपीच्या वतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश यांच्या समक्ष ॲड.जे.एस.पठाण यांनी युक्तीवाद केला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीमती.एस.एन.माने (गादेकर) मॅडम यांनी आरोपी यांची दिनांक 03/04/2024 रोजी निर्दोष मुक्तता केली सदरील प्रकरणात आरोपीच्या वतिने ॲड. जे.एस. पठाण यांनी काम पाहिले व त्यांना ॲड.सिराज एस. खान, ॲड. जे.जे.सय्यद,अँड विजय राऊत,ॲड. आसिम शेख,ॲड. आसिफ शेख,ॲड. दादाराव गडदे यांनी सहकार्य कले.
ॲड. जे. एस.पठाण यांचा सत्कार
आरोपी यांची मा.न्यायालयात भक्कमपण बाजु मांडुन त्यांना न्याय मिळवून दिला त्याबद्दल आरोपी यांचे भाऊ शेख जुबेर, शेख अफसर यांनी ॲड. जे. एस.पठाण यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करुन आभार मानले.