महायुतीच्या प्रचारासाठी नितीन गडकरी,चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज हिंगोलीत मेळावा

 हिंगोली (प्रतिनिधी)
 हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज 21 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,अशोक चव्हाण आदी मित्र पक्षाच्या उपस्थितीत आज हिंगोलीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

हिंगोली लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा मोठा मेळावा होणार आहे.  

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर आज रविवारी दुपारी साडेतीन वाजता ही सभा होणार आहे. या वेळी शिवसेनेचे संपर्क नेते आनंदराव जाधव,हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे,कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, वसमतचे आमदार राजू नवघरे,माजी खासदार शिवाजी माने,भाजपचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे,माजी आमदार गजानन घुगे,माजी आमदार रामराव वडकुते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी.डी.बांगर,मनसेचे बंडू कुटे,आर.पी.आय.चे दिवाकर माने
आदी उपस्थित राहणार आहेत.

News Category: 
Hingoli

Sharing