पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम,बारावीत संस्कार बर्दापुरे तर दहावीत वैष्णवी पावडे विद्यालयातून प्रथम

वसमत, प्रतिनिधी -
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून बारावीत संस्कार बर्दापुरे तर दहावीत वैष्णवी फावडे हिने विद्यालयातून प्रथम येत बाजी मारली आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई बोर्डाचा दहावी व बारावीचा निकाल जाहिर केला आहे. यामध्ये हिंगोली जवाहर नवोदय विद्यालयाने घवघवीत यश मिळवले आहे. इयत्ता बारावीच्या वर्गात एकूण 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले प्रथम क्रमांक संस्कार बर्दापुरे ९०.८ टक्के द्वितीय क्रमांक प्रतिमा राऊत ९० टक्के तृतीय क्रमांक मंजुळा गीते ८३ टक्के यांनी यश मिळवले आहे तर
इयत्ता दहावीच्या वर्गात एकूण ७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पैकी ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .प्रथम क्रमांक वैष्णवी पावडे ९५.८३ टक्के द्वितीय क्रमांक अर्जुन राठोड९५.१७ टक्के , तृतीय क्रमांक भावेश तरटे ९५ टक्के मीळवून यश प्राप्त केले आहे.
निकालातील उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता दहावीत मराठी विषयात पाच विद्यार्थिनींना 100 पैकी 100 गुण प्राप्त झाले आहेत. त्यांची नावे अनुक्रमे अशी वैष्णवी पावडे ,गीता चव्हाण, प्राची चव्हाण ,श्वेता तरटे ,गौरी सूर्यवंशी तर गणित विषयात दोन विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण पडले त्यांची नावे अशी सुदर्शन भालेराव, आणि उत्कर्ष सूर्यवंशी.विद्यालयाला मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल प्राचार्य शंकर वाघमारे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की विद्यालय मॅनेजमेंट कमिटीचे चेअरमन जिल्हाधिकारी जितेंद्रजी पापळकर,आणि विभागीय अधिकारी सचिन खल्लाळ ,उपप्राचार्य गजेंद्रजी घोगरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गौरव महाराष्ट्राचा परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन