नांदेड येथे व्हेंटिलेटरवर असलेले नवजात बाळ वसमतच्या स्पंदन हॉस्पिटलमध्ये 12 दिवसात सदृढ,डॉ. सागर सातपुते व हॉस्पिटल टीम च्या प्रयत्नाने नवजात शिशुला जीवनदान

वसमत (प्रतिनिधी)
स्पंदन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर सागर सातपुते व डॉक्टर प्रणोती सातपुते व टीमच्या सर्वांकष प्रयत्नाने  हॉस्पिटल मध्ये दाखल  सिरीयस नवजात शिशुला जीवनदान मिळाले आहे

या बाबत सविस्तर वृत्त असे की डॉक्टर तिवडे दांपत्यांना संस्कार हॉस्पिटल नांदेड येथे जुळे नवजात शिशु प्राप्त झाले. सातव्या महिन्यातच जुळ्या बाळांचा जन्म झाला कालावधीच्या आतच बाळांचा जन्म झाल्यामुळे व बाळांचे वजन कमी असल्याने दोन्ही बालके जन्मतःहा सिरीयस होते त्यांना नांदेड येथे खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. दोन्ही बालकांपैकी मुलगा बरा झाला परंतु त्या मुलीची तब्येत मात्र खालावत गेली. शेवटी हताश होऊन मुलीला नशिबावर सोडण्यात आले. अशा अवस्थेत मुलीला नांदेड वरून वसमतला डॉक्टर सुमित नादरे यांच्या सहाय्याने स्पंदन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. व्हेंटिलेटर, सिपॅप च्या साह्याने तिच्यावर वसमत चे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सागर सातपुते यांनी उपचार केले डॉक्टर सागर यांचे अथक प्रयत्न तसेच त्या मुलीची जीवन जगण्यासाठी ची लढाई या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे मुलगी बारा दिवसात ठणठणीत बरी होऊन आपल्या मातेच्या कुशीत विसावली,आपली मुलगी आपल्या आयुष्यातून जाणार या विचाराने हताश झालेले आई-वडिलांच्या कुशीत त्यांचं गोंडस बाळ येताच आई वडिलांच्या डोळ्यांना अश्रू धारा आल्या आनंदाच्या अश्रु धुरात त्यांनी डॉक्टर सागर सातपुते ना त्रिवार वंदन करून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

पालकांची प्रतिक्रिया
डॉ.सागर सातपुते सर खरचं तुमचे आभार कोणत्या शब्दात व्यक्त करावं कळतं नाही....
माझी मुलगी पूर्ण एक महिना हायटेक हॉस्पिटल नांदेड मधी ऍडमिट होती तिथे तिच्या अस्तित्वाची शक्यता सुद्धा खूप कमी दिली होती मला त्या हॉस्पिटल मधील डॉक्टर चा विश्वास ठेवावं की नाही या गोष्टी पर्यंत मी विचारात पडलो होतो शेवटी मला माझ्या मनावर आणि डॉ.सागर सातपुते यांच्या प्रभावी उपचार पद्धतीवर असलेला विश्वास या दोन गोष्टी वर मी माझ्या मुलीला नांदेडहुन स्पंदन हॉस्पिटल वसमत मध्ये ऍडमिट करण्याचा निर्णय घेतला माझी मुलगी 27 दिवस नांदेड ला मृत्यूशी झुंज देत होती डॉ.सागर सातपुते सरांच्या उपचारा नंतर 12 दिवसांतच  मुलगी बरी झाली आज सुट्टी होताना चा क्षण भाऊक झालो असताना सरांनी भावा सारखं मला हसायला शिकवलं
धन्यवाद सर.... धन्यवाद स्पंदन हॉस्पिटल स्टाफ व टीम..
डॉ.ओंकार तिवडे (बाळाचे वडील)

News Category: 
Basmat

Sharing