वसमत शहरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणा-यांची संख्या वाढली,अवैध शस्त्र बाळगण्याची फॅशन धरतेय जोर,शहरातील दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक,नवयुवकांना शस्त्र पुरवठा करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुस्क्या आवळाव्या वसमतकरांची मागणी

वसमत (प्रतिनिधी) 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणा-यांची संख्या वाढली गेल्या रात्री स्थानिक गुन्हा शाखेचे विशेष पथक गस्त घालत असताना दोन तरुणांकडून घातक शस्त्रे जप्त करत दोघांना अटक करण्यात आली आहे

स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिलू व त्यांचे पथक गेल्या रात्री वसमत शहर व परिसरात गस्त घालत होते.या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या मोटारसायकलला अडविण्यात आले.
जुने बस स्थानक लक्की हॉटेल समोरील रस्त्यावर पथकाने नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल थांबवून तपासणी केली असता आरोपी हा दहशत पसरविण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी खंजीर घेऊन फिरताना आढळून आला.पोलीस पथकाने सदर खंजीर व मोटारसायकल जप्त केली असून आरोपीविरुद्ध भादंवि 4/25 भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या कारवाईत वसमत शहरातील कारखाना रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ अंधारात लपून बसलेला एक आरोपी रा.रेल्वे स्टेशन रोड वसमत याला पकडण्यात आले.  आरोपीविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 सदर कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिलू, पोलीस कॉन्स्टेबल शेख बाबर, गजानन पोकळे, विठ्ठल काळे आदिनी ही कारवाई केली

अवैध शस्त्र बाळगण्याची फॅशन -
शांत प्रिय असलेल्या वसमत शहरात अठरापकड जाती धर्माचे लोक शांततेत राहतात परंतु मागील काही काळापासून शहरातील युवा वर्गात बेकायदेशीर शस्त्र,अग्निशस्त्र,गावठी पिस्तूल,तलवार,
बाळगण्याचा जणू फॅशन सुरू झाला आहे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदनाखाली पोलिसांनी या पूर्वी विशेष ऑपरेशन हाती घेवुन अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध अनेक कारवाया केल्या आहेत परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे होतेय 
अशा घटनांना प्रभावी आळा घालण्यासाठी शहरात पुन्हा अवैध शस्त्र तपासणी मोहीम राबवून या नवयुवकांना अवैध शस्त्र पुरवणाऱ्याचा च पोलिसांनी छडा लावून अशा लोकांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे

News Category: 
Basmat

Sharing