काँग्रेसने विधान परिषदेवर मुस्लिम प्रतिनिधीत्व डावलले,मुस्लिम समाजात तिव्र नाराजगीचे पडसाद येण्यास सुरुवात,अब्दुल हफिज यांचा प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुक-2024 मध्ये कोणत्याही मुस्लिम पदाधिकारी/कार्यकर्त्याला/ उमेदवारी न मिळाल्यामुळे समाजातुन काँग्रेस पक्षावर मरावाड्यातुन   तिव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे समाजाच्या भावना पाहता गेली ४० वर्षा पासून हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तिनवेळेचे नगराध्यक्ष अब्दुल हफिज अब्दुल रहेमान यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सोपवल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

नाना पटोले यांना सोपवलेल्या आपल्या राजीनाम्यात अब्दुल हफिज यांनी नमुद केले की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम अल्पसंख्याकांचे 90% मते काँग्रेस सह इंडिया आघाडीच्या बाजूने होती. मी गेल्या 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहे, मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागा महाविकास आघाडी च्या निवडून आल्या तरी मराठवाड्या ला अल्पसंख्यांक प्रतिनिधीत्व देण्यात आले नाही.

आ. प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडी च्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार हिंगोली लोकसभेचे खासदार श्री. नागेश पाटील आष्टीकर पक्ष श्रेष्ठीकडे केली होती तरी सुधा त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली, 

या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मान खालावली आहे. पक्षाने मुस्लिम समुदायाच्या अपेक्षा आणि त्यांच्या प्रतिनिधित्वाची उपेक्षा केली आहे,यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे निवेदनात नमूद केले

हिंगोली जिल्ह्यात अब्दुल हफिज यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या भूमिकेमुळे काही दिवसात काँग्रेसचे जिल्हा,तालुका,शहर पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देण्याची शक्यता आहे

News Category: 
Basmat

Sharing