जयप्रकाश दांडेगावकर यांना लाईफ टाईम आचिवमेंट अँवार्ड जाहीर,दि.शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ इंडीया,नवी दिल्लीने केली निवड

वसमत (प्रतिनिधी)
दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ इंडीया,नवी दिल्ली या संस्थेने माजी मंत्री,राष्ट्रीय साखर संघाचे मा.अध्यक्ष,पूर्णा साखर कारखाण्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांना मानाचा समजला जाणारा लाईफ टाईम आचिवमेंट अँवार्ड जाहीर केला आहे
अखिल भारतीय स्तरावरील साखर उद्योगातील नावाजलेले तांत्रिक अधिकारी व पदाधिकारी यांनी सन १९२५ ला स्थापना केलेली दि.शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोशिएशन ऑफ इंडीया,नवी दिल्ली येथील संस्था असून सदरची संस्था साखरे संबंधीचे धोरण ठरवितांना केंद्र शासनास सल्ला देऊन महत्वाची भूमिका पार पाडत असते.सदरील संस्थेकडून साखर उद्योगाची प्रगती व विकास कामासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा "Life Time Achievement Award" हा संस्थेचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत असतो.
या वर्षी संस्थेने सदर पुरस्कारासाठी मा. जयप्रकाश दांडेगांवकर यांची निवड केली आहे सदर पुरस्कार दि.३० जुलै २०२४ रोजी संस्थेच्या ८२ व्या वार्षिक संम्मेलनाचे उद्घाटन समारोह जयपुर (राजस्थान) येथे प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या निमित्त आज पूर्णा साखर कारखाना येथे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी उपाध्यक्ष डॉ.सुनिलराव कदम,शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष शहाजीराव देसाई सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक सुनिल दळवी,व्यापारी प्रतिनिधी कन्हैया बाहेती,संजय काकडे,जावेद जिलानी आदींची उपस्थिती होती
गौरव महाराष्ट्राचा परिवाराकडून मा.जयप्रकाश दांडेगावकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा