ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन आपत्ती व्यवस्थापन शाखा द्वारा जनजागृती कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी) ऑल इंडिया मेमन फेडरेशन-आपत्ती व्यवस्थापन शाखा, तथा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या सहकार्याने, 6 ऑगस्ट 2024 रोजी नांदेडच्या मदिनातुलम हायस्कूलमध्ये आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला

नागरिकांना,विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व या विषयी शिक्षित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाला संयोजक फिरोज पोची आणि मकरानी इब्राहिम यांच्यासह अनिस मेमन इब्राहिम पिरानी आणि जावेद गिगरा उपस्थित होते.

 एआयएमजेएफचे अध्यक्ष इक्बाल मेमन ऑफिसर,उपाध्यक्ष गुलाम मोहम्मद मिठूभाई आणि आपत्ती व्यवस्थापन शाखेचे अध्यक्ष अब्दुल रज्जाक वर्षानी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आपत्ती व्यवस्थापन विंगचे अध्यक्ष अब्दुल रज्जाक वर्षानी म्हणाले, "आम्ही आपत्ती प्रतिरोधक समुदाय तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि हा कार्यक्रम हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."

 या उपक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,त्यांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

News Category: 
Marathwada

Sharing