बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसची वसमत येथे जनसन्मान यात्रा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती

वसमत (प्रतिनिधी) वसमत राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा २८ ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील कारखानारोड मयुर मंगल कार्यालया समोरील मैदानावर दाखल होणार आहे
या बाबत नियोजना संदर्भात शहरातील मयुर मंगल कार्यालयात सोमवारी आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुनील तटकरे यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. या यात्रेच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, बैठकीत कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत
या वेळी आ.राजेश विटेकर, सभापती तानाजी बेंडे, उपसभापती सचिन भोसले, बालाजी ढोरे, त्र्यंबक कदम,शमीम सिद्दिकी,चंद्रकांत दळवी, मुंजाजी दळवी आदींची उपस्थिती होती.
सभेस मोठ्या संख्येत सहभागी व्हावे,असे आवाहन आ.राजुभैय्या नवघरे यांनी केले आहे.