सोमवार पासुन सी.सी.आय कापुस खरेदीस शुभारंभ,कापसाला मिळणार ७५२१ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव


वसमत (प्रतिनिधी)
पुर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्क हयातनगर फाटा येथे सी.सी.आय कापुस खरेदीस सोमवार दि १८ नोव्हेम्बर पासुन शुभारंभ होत आहे
वसमत तालुक्यातील पुर्णा ग्लोबल टेक्स्टाईल पार्क येथे ओंकार फैब्रिक्स जिनिंग प्रेसींग मध्ये दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सी.सी.आय कापूस खरेदी चा शुभारंभ दिनांक १८ रोजी सोमवार दुपारी १२.०१ वाजता होणार आहे.
सी.सी.आय कडुन या वर्षी कापसाला प्रतिक्विंटल ७५२१ रुपय हमीभाव (८ मॉइश्चर कंडीशन) साठी निश्चित करण्यात आले आहे तसेच १२ मॉइश्चर वरिल माल रिजेक्ट करण्यात येईल शिवाय आवश्यक सूचनांचे पालन करुन कापूस खरेदी केली जाणार आहे परिसरातील कापूस उत्पादक शेतक-यांना खाजगीत कमी भाव मिळत होते दरम्यान सि.सि.आय खरेदी सुरु होणार असल्यामुळे शेतकरी केंद्राचा लाभ घेऊ शकतात.तसेच कुठल्याही प्रकारचा शेतकर्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची हमी ओंकार फॅब्रिक्स च्या वतीने देण्यात आली आहे
टीप- कापूस खरेदीसाठी लागणारी कागदपत्रे आवश्यक सूचना सोबत जोडल्या आहेत