पूर्णा पाटबंधारे विभागाच्या अभियंतांना मारहाण, आरोपी विरुद्ध शहर पोलोसात गुन्हा दाखल, कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन करीत तीव्र निषेध

वसमत (प्रतिनिधी)
वसमत शहरात असलेल्या पूर्णा पाटबंधारे विभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना कोरकोळ कारणाने मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत आरोपीवर तात्काळ कार्यवाहीची मागणी केली
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता बिराजदार हे बुधवारी त्यांच्या कार्यालयात शासकीय काम करत होते त्याच वेळी एक व्यक्ती कार्यालयात आले आणि कार्यकारी अभियंता बिराजदार यांच्याशी माहिती का देत नाही या कोरकोळ कारणावरुन वाद सुरू केला आणि कार्यकारी अभियंता बिराजदारांना मारहाण सुरू केली.अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे कार्यालयात एकच धावपळ उडाली दरम्यान आरोपी व्यक्ती तिथून पसार झाला
घटनेची माहिती मिळताच वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ,सपोनि महाजन,फौजदार बोंडले, फौजदार कसबेवाड बिट जमादार शेख नय्यर,केशव गारोळे,इम्रान कादरी आदीनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून चौकशी केली
घटनेनंतर कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी आंदोलन सुरू केले आणि तहसीलदार शारदा दळवी यांना भेटून त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत आरोपींवर कार्यवाहीची मागणी केली असता त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्या बाबत कर्मचार्यांना आश्वस्त केले
दरम्यान होमगार्ड कॉलनी वसमत येथील व्यक्तीने मला थापड बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची व खोटा ॲट्रॉसिटी नाहीतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची तक्रार स्वतःहा कार्यकारी अभियंता एस.बी.बिराजदार यांनी शहर पोलिसात दिल्याने आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पो.नि वाघ यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेणे बाबत पोलीस यंत्रणा कामाला लावली आहे
प्रकरणाचा पुढील तपास पो.नि सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बोंडले करीत आहेत