पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आदित्यचा सत्कार

वसमत (प्रतिनिधी) वसमत येथील खेळाडू आदित्य कैलास राठोड यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आमदार राजू नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती
क्रिडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणेच्या मार्गदर्शनाखाली ड्रॉप रो बॉल असोसिएशन राज्य महाराष्ट् व ड्रॉप रोबाल असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ड्रॉप रो बाल शालेय क्रिडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत संघास राज्यस्तरीय उपविजेतेपद मिळवून देणाऱ्या आदित्य कैलास राठोड याचा हिंगोली जिल्हयाचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आमदार राजू नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष अमजद खान ऊर्फ नम्मू,अड.मोबीन,संदीप चव्हाण ,कैलास राठोड,यश चव्हाण,कलीम खान यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते