दर्गाह मौलवी साहेब रह.यांचा १३४ वा उर्स  उत्साहात संपन्न

वसमत (प्रतिनिधी)
वसमत येथील मुसाफिर शाह मोहल्ला दर्गा मौलवी सहाब रह.यांचा १३४ वा उर्स विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला

दर्गा मौलवी साहेब हजरत शाह मोहम्मद गुलाम नक्शबंद रह. यांचा संदल दि २६ फेब्रुवारी ला संध्यकाळी कुराण खानी,शजरा खानी, हल्का जीक्र,संदल, फातेहा होऊन लंगर ने संपन्न झाला
वसमत येथील सदर दर्गाह कंधार येथील हजरत मौलवी साहेब शाह रफिउद्दीन कंधारी रह.यांच्या मुलाची असून ते वसमत येथील खूप जुने सुफी संत आहेत.सुफी संत महटले की माणुसकी,सलोखा, बंधुता,सर्व धर्म समभाव आणि अन्नदान करण्याची शिकवण जपली जाते.

सदर संदल हजरत खारी शाह मोहम्मद ताजुद्दिन उमर पाशा फारूखी़ खा़दरी रफाई (सज्जादा नाशीन दर्गा मौलवी शाह रफीउद्दीन कंधारी रह.कंधार) यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडले.मस्जिद मौलवी साहेब व दर्गा मौलवी साहेब वसमत यांचे मुतवल्ली आणि सज्जादा नशीन मोहम्मद अनिसोद्दीन मोहम्मद शमशोद्दीन फारोखी यांच्या अध्यक्षतेखाली व खारी शाह मोहम्मद रफीउद्दीन मोहम्मद अनिसोद्दीन फारूखी यांच्या नेतुत्वामध्ये संदल मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्याच्या मार्गाने पार पडली संदल ला यशस्वी करण्यासाठी शेख आसीम,सय्यद अर्शद,सुमेर सिद्दिकी, हाफेज शादब सिद्दिकी,हारून शेख, सय्यद जहीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

वसमत पोलिस प्रशासनच्या सहकार्यने संदल मिरवणूक यशस्वी पार पडली या निमित्त मुतवल्ली म.अनिसोद्दीन म. शमशोद्दीन फारोखी ह्यानी वसमत पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ व   कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला

 या वेळी नांदेड,कंधार, परभणी येथिल विविध दर्गाह चे सज्जादा नशिन व मुतवली तसेच वसमत चे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज,सेवा निवृत्त फौजदार राजु सिद्दीकी, युनूस पॉपुलर,पत्रकार अय्युब पठाण,नविद सिद्दीकी,आसिम शेख,सालार ए जंग ग्रुपचे सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

News Category: 
Marathwada

Sharing