वक्फ बिल कायदा रद्द करण्याची विविध संघटनांची मागणी,मुस्लिम समाजाकडून गुरुवारी बत्ती गुल आंदोलन यशस्वी

वसमत (प्रतिनिधी)
शासनाने नुकतेच पारित केलेले वक्फ बिल कायदा
संविधानाच्या कलम क्रमांक १४,२५,२६ आणि २९ मध्ये नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे असुन सदर बिल रद्द करण्याची मागणी विविध संघटनांनी शुक्रवारी राष्ट्रपती भारत सरकार यांच्या कडे केली आहे 

शुक्रवारी दुपारी वसमत येथे विविध संघटनांकडुन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना वक्फ बिल विरोधात निवेदन देण्यात आले यात नमूद करण्यात आले की 
सरकारने हे जे काळे मुस्लिम विरोधी विधेयक पास केले हे विधेयक म्हणजे संविधानावर हल्ला होय. 
या कायद्यामार्फत  देशात मुस्लिम विरोधी मत सरकार तयार करण्याचे काम करत आहे.
या काळया कायद्या विरोधात सकल मुस्लिम समाज बरोबर भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सह आदि संघटने मार्फत सुद्धा सदर बिलाचा निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले 
या वेळी शेख अखिल इब्राहिम, मुफ्ती अल्ताफ रजा,मौलाना मोहम्मद फारूक, भारतीय बौद्ध महासभेचे सुनील काळे सर,मानकरी सर,भास्कर सूर्यवंशी,सुभाष वाघमारे,चौरंगे सर, तातेराव सर, भास्कर गवळे,शेख अय्युब,इरफान पठाण,शेख मजहर,अ.राशेद अ.हफीज,महेमूद अली आदी मान्यवरा सह विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य,मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते
-------------

गुरुवारी बत्तीगुल आंदोलन यशस्वी-

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या सूचनेनुसार  गुरुवारी वसमत शहरात रात्री ९ रात्री ते ९:१५ वाजे दरम्यान दुकान व घराची लाईट बंद करुन देशव्यापी बत्ती गुल (लाईट बंद आंदोलन) ला समाजाने १००% पाठिंबा देत यशस्वी आंदोलन केले

News Category: 
Basmat

Sharing