ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस शांतीदूत सेवारत्न पुरस्काराने गौरवान्वित

पुणे (प्रतिनिधी) जेष्ट विचारवंत, साहित्यिक, लेखक तथा ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष; डॉ. श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल व त्यांच्या पुरोगामी वैचारिक समाजप्रबोधनाच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल शांतीदूत परिवाराच्या वतीने ' शांतीदूत सेवारत्न पुरस्कार ' देवून सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वाटचालपूर्तीचे औचित्य साधून, शांतीदूत परिवारातर्फे त्यांच्या निवासस्थानी जावून डॉ. श्रीपाल सबनीस व सौ. ललिता सबनीस यांचे अभिष्टचिंतन करत, त्यांच्या साहित्यसेवेविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करीत, त्यांना शतायुष्याच्या मंगलकामना व्यक्त करण्यात आल्या.
या निमित्ताने शांतीदूत परिवारातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले गेले की , " मराठी साहित्यक्षेत्रातील डॉ. श्रीपाल सबनीस हे एक सर्वप्रिय व्यक्तित्व आहेत. समाजातील विविध विचारधारा व साहित्यप्रवाहां विषयीची आपली विधायक भूमिका आपल्या स्पष्टवक्तेपणातून अवघा महाराष्ट्र सातत्याने अनुभवतो आहे. आपल्या वाणी आणि लेखनीला कोठलाही विषय वर्ज्य नाहिये. विविध पुस्तके, ग्रंथ व काव्यसंग्रहांना आपण लिहिलेल्या अभ्यासू प्रस्तावना, स्तंभ लेखन, विषयन्यायिक उच्च संपादने, साक्षेपी समीक्षा आपल्या लेखनकर्तृत्वाचीच साक्ष देतात. संत श्री ज्ञानेश्वर ते नव आंबेडकरवाद, वारकरी संगीत ते छत्रपती श्री शिवाजी महाराज अशा विविधांगी विषयांवरील आपल्या साहित्यसंपदेतून एक वेगळेच विचारदर्शन घडते. आपले अमोघ वक्तृत्व व विचारप्रवण लेखन सांप्रतसमयी मराठी साहित्यविश्वाला एक वेगळेच वळण देणारे ठरलेले आहे, हे आम्ही विनम्रपूर्वक नमूद करतो " !... .
सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीपाल सबनीस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी शांतीदूत परिवाराच्या वतीने डॉ. विठ्ठल जाधव, IPS विशेष पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, ( से. नि. ) , सौ. विद्याताई जाधव संस्थापक - अध्यक्षा, शांतीदूत परिवार, सौ. तृषाली जाधव, राष्ट्रीय अध्यक्षा, सौ. आरती घुले राष्ट्रीय उपाध्यक्षा, सौ. मोनिका भोजकर अध्यक्षा महाराष्ट्र महिला विभाग, विजय बोत्रे पाटील अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, शांतीदूत परिवार, प्रसिद्धीप्रमुख शांतीदूत परिवार तथा पत्रकार राजेंद्र सोनार, मधू चौधरी अध्यक्ष, शिवाजीनगर व शांतीदूत नितीन दुधाटे उपस्थित होते. विजय ता. बोत्रे पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.