वसमत नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी आमदार राजू नवघरे ची मोर्चे बांधणी, माजी नगराध्यक्ष, चार माजी नगरसेवक, माजी नगर अभियंताचा राष्ट्रवादीत प्रवेश


वसमत प्रतिनिधी आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी वसमतचे आमदार राजू भैया नवघरे यांनी युद्धपातळीवर मोर्चे बांधणी सुरू केली असून आज माजी नगराध्यक्षांसह असंख्य माजी नगरसेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करून घेतला आहे
आज 30 जुलै रोजी सकाळी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वसमत येथील भाजपाचे माजी नगराध्यक्ष वैजनाथ गुंडाळे,माजी नगरसेवक दीपक हळवे,माजी नगरसेवक धनंजय गोरे,माजी नगरसेवक वसंत चेपुरवार,माजी नगरसेवक दिलीप भोसले यांच्या सह माजी नगर अभियंता रत्नाकर आडशीरे
या सर्व मान्यवरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे
या प्रवेशप्रसंगी मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसीन मुश्रीफ,अन्न, प्रशासन व औषध मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ,कृषीमंत्री मा. माणिकरावजी कोकाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती
माजी नगरसेवक सचिन दगडू आदीनी उपस्थित राहून सर्वाचे स्वागत केले.
पक्ष प्रवेश स्वीकारत राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर आणि वसमत विधानसभा मतदारसंघातील जनतेचा सेवक म्हणून माझ्या कार्यशैलीवर विश्वास दर्शवला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
आ.राजु नवघरे
(वसमत विधानसभा)