रामदास पाटील यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

हिंगोली (प्रतिनिधी)लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे या संस्थेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष यांनी नुकतेच प्रदान केले आहे
हिंगोली,नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील वीरशैव लिंगायत समाज हिताचे कार्य असलेल्या रामदास पाटील सुमठानकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे या संस्थेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री सुमठानकर यांना अध्यक्ष प्रा रमेश आवटे यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे.
सन १९७८ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रसिद्ध उद्योजक स्व. निळकंठ सेठ कल्याणी, नामदेव सेठ रुकारी यांच्यासह अनेक महात्म्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्र येऊन पुणे येथे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा ची स्थापना केली. या सामाजिक संस्थेवर रामदास पाटील सुमठानकर यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा रमेश आवटे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर होनराव यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र नुकतेच श्री सुमठानकर यांना देण्यात आले आहे. या नियुक्ती बाबत वीरशैव लिंगायत समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.