रब्बी हंगाम पिकांसाठी पाणी आवर्तन नियोजन तात्काळ करा, आमदार राजूभैया नवघरे यांचे पालकमंत्री,पाटबंधारे विभागाला पत्र


फेरोज पठाण (संपादक) रब्बी हंगाम पिकांसाठी पाणी आवर्तन नियोजनसाठी तात्काळ बैठक बोलावून पाणी वितरणाची नियोजन करण्याबाबतचे लेखी पत्र वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे यांनी आज दि.१५ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री हिंगोली जिल्हा तथा, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य,मा.ना.अब्दुल सत्तार सह पाटबंधारे विभागाला दिले आहे
पुर्णा प्रकल्पाअंर्तगत प्रमुख असलेले येलदरी व सिध्देश्वर हे दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. या काळात रब्बी हंगामासाठी पिकांना पेरणीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. त्यानुषंगाने सिध्देश्वर व येलदरी धरणातून निघालेल्या कालवा व त्यावरील शाखा कालवे यांच्या व्दारे लाभान्वित असलेल्या सिंचन क्षेत्रासाठी पाणी आर्वतन सोडण्याची गरज लक्षात घेता आवर्तनाच्या नियोजनाच्या कार्यवाहीसाठी तात्काळ बैठक लावण्यात यावी तसेच बैठकीला विलंब होत असल्यास शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता पहिले पाणी पाळी सोडण्यात यावी अशी मागणी आ. राजूभैया नवघरे यांनी केल्याने प्रशासकीय स्तरावर लवकरच सकारात्मक विचार होऊन शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे