तोतया सहाय्यक जिल्हाकारी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या आरोपीला अटक,5 लाखांची रोकड,शासकीय शिक्के,कागदपत्र जप्त,२ पत्रकार ही ताब्यात

हिंगोली (प्रतिनिधी) गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा दंडाधिकारी म्हणून बनावटगिरी करणाऱ्या आरोपीसह तिघांना हिंगोली पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हिंगोली अटक केली असून केली असून त्यांच्या जवळून ५ लाखांची रोकड,शासकीय शिक्के,कागदपत्र जप्त करण्यात आली आहे
या बाबतची संपूर्ण माहिती अशी,पोलिस अधीक्षक जी.श्रीधर हे १५ फेब्रुवारी रोजी शहरातील पोद्दार इंग्लिश स्कूलच्या वार्षिक उत्सवाच्या कार्यक्रमाला गेले होते. याच कार्यक्रमात आरोपी अमोल वासुदेव पजई हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, शाळेचे मुख्याध्यापक विनय उपाध्याय यांनी अमोल पजई यांची एसपी जी.श्रीधर यांच्याशी ओळख करून देताना सांगितले की, अमोल पजई हे हिंगोलीचे सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी आहेत. हे ऐकून एसपी श्रीधर ही चक्रावले. हद्द तर त्यावेळी झाली अनेकांची फसवणूक करणारा अमोल पजई १६ फेब्रुवारीला सकाळी एसपी जी.श्रीधर यांना भेटण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचला दरम्यान एसपी श्रीधर यांना पजईवर संशय आला आणि एसपी जी.श्रीधर यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना आरोपी अमोल ची माहिती काढण्यास सांगितले. एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता आरोपी अमोल पजई हा हिंगोली प्रशासनात सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी नसल्याचे समोर आले.त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून अमोल पजई यांना पकडून त्यांची कार तपासली असता कारमध्ये ५ लाख ९३ हजारांची रोकड आढळून आली. सूत्रांनी सांगितले की, आरोपी अमोल पजई हा स्वत:ला आयएएस अधिकारी म्हणवून घेतो आणि गेल्या दोन महिन्यांपासून हिंगोली येथे सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी म्हणून नागरिकांना सांगतो. अमोल पजई यांनी काही पत्रकारांसह हिंगोली शहरात खासगी अर्बन बँक सुरू करून ठराविक रक्कम आकर्षक व्याजावर जमा करण्याचा व्यवसायही सुरू केला आहे. त्यांच्या या कामात शहरातील काही पत्रकारही सहभागी झाले आहेत.आरोपी अमोल पजई याच्याकडून वनविभागाची बनावट कागदपत्रे व जिल्हा दंडाधिकारी व न्यायदंडाधिकारी यांचे बनावट शिक्के व लेटरपॅड, एनटीसी आवारातील अर्बन बँकेची कागदपत्रे,भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीच्या नावे असलेले भाडेपत्र.सुषमा अमोल पजई यांची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोद्दार शाळेचे मुख्याध्यापक विनय उपाध्याय यांच्या फिर्यादीवरून आरोपी ठग अमोल वासुदेव पजई याने हिंगोली शहर पोलिस ठाण्यात पोद्दार शाळेत बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या मुलांना प्रवेश मिळवून दिला, प्रशासनाची बनावट कागदपत्रे बनवून नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७०, १७०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी अमोल पजईसह अन्य दोन पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे
जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे